Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इमरजन्सी हेल्थ सेवांसाठी RBI ने दिले 50,000 कोटी

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था विशेष प्रभावित झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, 05 मे:– देशात कोरोना व्हायरसचा हाहाकार वाढत आहे. देशात दररोज 3.50 लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. अशावेळी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था विशेष प्रभावित झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मीडियाला संबोधित करताना दास यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. दास यांनी असं म्हटलं आहे की, ‘दुसऱ्या लाटेविरोधात ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. या संपूर्ण परिस्थितीवर RBI ची नजर आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर काहीशी सुधारणा झाली होती’. दरम्यान आरबीआयने इमरजन्सी हेल्त सेवांसाठी मोठी घोषणा केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

इमरजन्सी हेल्थ सेवांसाठी 50000 कोटी

आरबीआयने आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 50,000 कोटी रुपये दिले. याद्वारे बँका लसी उत्पादक, लसी वाहतूक, निर्यातदारांना सोप्या हप्त्यांमध्ये कर्ज उपलब्ध करुन देतील. याशिवाय रुग्णालये, आरोग्य सेवा पुरवठा करणा्यांनाही हा लाभ मिळणार आहे. प्रायोरिटी क्षेत्रासाठी लवकरच कर्ज आणि इन्सेटिव्ह दिलं जाईल, असे शक्तीकांत दास यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारतीय रिझर्व्ह बँक वाढत्या कोव्हिडच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि दुसऱ्या लाटेमुळे त्रस्त नागरिक, व्यापारी संस्था आणि संस्थांसाठी सर्व संसाधने आणि उपकरणे तैनात करेल, अशी माहिती दास यांनी दिली आहे.

Comments are closed.