Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी अभियानाला सुरुवात

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या कार्यासाठी पाच लाख रुपयांचा चेक ट्रस्टकडे सोपवला आहे.

कन्नड अभिनेत्री प्रणिता सुभाषने 1 लाख रुपयांचा निधी समर्पित. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई डेस्क 15 जानेवारी :- अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देशभरात आजपासून निधी संकलनाची मोहीम सुरू झाली असून हा निधी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र नावाने स्वीकारला जाणार आहे. देशभरात ही मोहिम राबविला जात आहे. 27 फेब्रुवारी पर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे. या वर्गणी अभियानाची सुरवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून झाली असून मंदिराच्या उभारणीसाठी राष्ट्रपतींनी पाच लाखांचा चेक ट्रस्टकडे सोपवला आहे.

कन्नड अभिनेत्री प्रणिता सुभाषने सुद्धा अयोध्येत राम मंदिराच्या भव्य बांधकामासाठी 1 लाख रुपयांचा निधी समर्पित करण्याची घोषणा केली आहे. प्रणिता सुभाषने ट्विटरवर आपल्या योगदानाची घोषणा केली, ‘मला अयोध्या राम मंदिर निधी समर्पण मोहिमेमध्ये 1 लाख द्यायचे आहे’ आपणा सर्वांना या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्याची विनंती केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या वर्गणी अभियानातून जमा झालेल्या वर्गणीतून अयोध्येत भव्य असे राम मंदिर उभारण्याचा मानस ट्रस्टच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. या अभियानात 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये अशा स्वरुपात वर्गणी गोळा करण्यात येत असून वर्गणी दिलेल्यांना त्याची पावती तसेच मंदिर आणि भगवान रामाचे एक चित्र देण्यात येणार आहे.

Comments are closed.