Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जालना-खामगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास सुरुवात

विजय साळी , लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना दि ०५ जाने :– जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला आज जालना रेल्वे स्थानकापासून सुरुवात झाली. १६२ किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग जालना विदर्भातल्या देऊळगावराजा, सिंदखेडराजा, जळगाव, चिखली आणि खामगाव तालुक्यांमधून जाणार आहे. पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच पथक पुढील पाच दिवस चालणाऱ्या या सर्वेक्षणात या भागातून उद्योग-व्यवसाय, कृषी, शैक्षणिक आणि अन्य कारणामुळे होणाऱ्या प्रवासी वाहतुकीची सविस्तर माहिती घेऊन या रेल्वे मार्गाच्या उपयुक्ततेचा अभ्यास करणार असल्याच मध्यरेल्वेच्या सर्वेक्षण विभागाचे उपमुख्य परिचालन प्रबंधक सुरेश जैन यांनी सांगितलं. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडून तीन महिन्यांत रेल्वे मंत्रालयास सादर केला जाईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जालना – खामगाव रेल्वेमार्गाची गरज ओळखून ब्रिटीश शासन काळात या लोहमार्गाचे काम सुरू झाले होते. परंतू काही कारणास्तव हे काम बंद पडले. त्यानंतर जालना – खामगाव येथील रेल्वे संघर्ष समितीसह नागरीकांनी या लोहमार्गासाठी अनेक आंदोलने केली, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना निवेदने दिली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वेमंत्रालयाशी पत्रव्यवहार केला व प्रत्येक बैठकीत ही मागणी लावून धरत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी जालना – खामगाव रेल्वे मार्गाबाबत सविस्तर चर्चा केली व मागील पाठपुरावा आणि पत्रव्यवहाराची माहिती त्यांना दिली.

अगोदर झालेला सर्वे,अधिकाऱ्यानी दिलेला अहवाल यावरही दानवे यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत चर्चा करून हा जनभावनेचा प्रश्न असून मराठवाडा – विदर्भाला जोडणारा महत्वाचा मार्ग असल्याचे त्यांना पटवून दिले. देऊळगावराजा, चिखली, खामगाव येथील व्यापाऱ्यांशी जालन्याशी असलेला दररोजचा व्यवहार,मराठवाड्यातून शेगावला जाणाऱ्या पर्यटकांची,भाविकांची संख्या आदींबाबत विस्तृत चर्चा झाल्यानंतर रेल्वेमंत्री गोयल यांनी ही बाब गांभिर्याने घेत तातडीने मध्य रेल्वे व्यवस्थापनास या मार्गाचा नव्याने सर्वे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रेल्वेच्या वाहतूक निरीक्षकांसह सर्वसंबंधीतांच्या एका पथकाने आज पासून जालना येथून सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर जमीन अधिग्रहनासह रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात होईल असंही जैन यांनी यावेळी सांगितलं. या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाव्यतिरिक्त सुमारे तेराशे कोटी रुपायांचा खर्च अपेक्षित असल्याच जैन म्हणाले.

Comments are closed.