Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टीम इंडियाचा झिम्बाब्बेवर 71 धावांनी मोठा विजय

टीम इंडिया सेमी फायनलला इंग्लंड विरूध्द खेळणार सामना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

टी-20, 06 नोव्हेंबर :- टीम इंडियाने आज सुपर 12 राउंडमधील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेवर 71 धावांनी मोठा विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेदरलॅंडकडून पराभव झाला. त्यामुळे या मॅचआधीच टीम इंडियाचा सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित झाला होता. फक्त ग्रुप मध्ये टाॅपर कोण राहणार हा प्रश्न होता. टीम इंडिया ग्रुपमध्ये टाॅपवर आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने आज टाॅस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुर्यकुमार यादव ने 25 चेंडूत नाबाद 61 आणि केएल राहुल ने 51 रन्सच्या बळावर टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 186 धावा केल्या. झिम्बाब्वेचा डाव 115 धावातच आटोपला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आजच्या मैचमध्ये सुरवातीपासूनच टीम इंडियाने झिम्बाब्वेला धक्के दिले. झिम्बाब्वेकडून रायन बर्लने 35 आणि सिकंदर रझाने 34 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर झिम्बाब्वेला धक्का दिला. भारताकडून हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीने प्रत्येकी 2, रविचंद्रन, अश्विनने 3 आणि भुवनेश्वर, अर्शदीप, अक्षर ने प्रत्येकी 1 विकेट घेतली. टीम इंडियाने सुपर 12 मध्ये फक्त दक्षिण आफ्रिके विरूध्द सामना गमावला. पाकिस्तान, नेदरलॅंड, बांग्लादेश आणि झिम्बाब्वे विरूध्दचा सामना जिंकुन ग्रुपमध्ये 8 पाॅईंटसह टाॅप पर राहिले.

सेमीफायनलमधील चार टीम्स निश्चित झाल्या आहेत. ग्रुप 1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड तर ग्रुप 2 मधून भारत आणि पाकिस्तान या दोन टीम्स टी-20 विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाल्या आहेत. ग्रुप 1 मधील टाॅप टीम ग्रुप 2 मधील दुसर्या स्थानावरील टीम बरोबर आणि ग्रुप 2 मधील टाॅप टीम ग्रुप 1 मधील दुसर्या स्थानावरील टीम बरोबर खेळणार आहे. म्हणजे ठीम इंडियाचा सामना इंग्लंड विरूध्द तर पाकिस्तान न्यूझीलंडला भिडणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.