Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासावी – कंकडालवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी, 06 नोव्हेंबर :-  युवक हा देशाचा आधारस्तंभ असून युवकांनी खेळासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत व्यक्तीमत्व विकासाला चालना द्यावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. ते अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथे जय सेवा युवा मंडळाच्या वतीने भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आलापल्लीचे माजी सरपंच विजय कुसनाके होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच किशोर आत्राम, उपसरपंच उमेश मोहुर्ले, माजी उपसभापती गिता चालुरकर, नरेश मडावी, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी सरपंच दिलीप गंजीवार, संदीप बडगे, जुलेख शेख, कार्तिक तोगम, दादाराम मडावी, हरी आत्राम, अनंत साना, कालिपद वैद्य, सोमाजी आत्राम, आनंद चहाकाटे, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कंकडालावार पुढे म्हणाले की, आज ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हाॅलिबाॅल, क्रिकेट, कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाला पाहिजे व एक चांगला खेळाडू तया झाला पाहिजे. तेव्हाच आपल्या गावासोबतच जिल्ह्याचा नावलौकिक होईल. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार 25 हजार 1 रू., द्वितीय पुरस्कार 21 हजार रू. तर तृतीय पुरस्कार 11 हजार रूपये देण्यात येणार आहे.

जयसेवा युवा मंडळ किष्टापूर यांच्या वतीने भव्य टेनिस बाॅल क्रिकेट सामन्याचे अध्यक्ष हरी आत्राम, उपाध्यक्ष अनिल दब्बा, मधुकर झोडे, सचिव जीवन आत्राम, सहसचिव गौतम गावळे, कोषाध्यक्ष मनीष मडावी, क्रिडा प्रमुख अजित आत्राम आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि गावकरी प्रयत्न करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.