Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

कोल्हापूरच्या डॉ. भालचंद्र काकडे यांचा चेन्नई इथे झालेला मृत्यू .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चेन्नई डेस्क 08 मे:-ऑक्सिजनचा उपयोग विविध क्षेत्रात कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलेल्या आणि तब्बल सात पेटंट घेतलेल्या मराठमोळ्या तरुण संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. कोल्हापूरच्या डॉ. भालचंद्र काकडे यांचं चेन्नईत निधन झालं. ते 44 वर्षांचे होते.

डॉ. भालचंद्र काकडे यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. किरकोळ लक्षणे असल्याने चार दिवस त्यांनी घरातच उपचार घेतले. पण, एक दिवस प्रकृती बिघडल्याने त्यांना चेन्नई इथल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन दिवस त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. त्यांची प्रकृतीही सुधारली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणि ते उपचाराला अतिशय चांगला प्रतिसाद ते देत होते. पण, मंगळवारी रात्री उशिरा अचानक त्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला. यामुळे तिथे उपचार घेत असलेल्या दहा जणांचा तडफडून मृत्यू झाला. त्यामध्ये डॉ. काकडे यांचाही समावेश होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डॉ. भालचंद्र काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा वापर करुन विविध क्षेत्रात काय करता येईल याचे संशोधन सुरु केलं. या संशोधनात त्यांनी सात पेटंटही मिळवली. जपान, अमेरिका इथली फेलोशिपही त्यांना मिळाली. यामुळे आंतरराष्ट्रीय संशोधक म्हणून त्यांचं जगभर नाव झालं.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.