Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबट्याच्या हल्ल्यात मेंढ्याची २० पिल्ले मृत तर चार गायब…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सांगली, दि. ९ डिसेंबर :  शिराळा तालुक्यातील कापरी  येथे सिध्देश्वर मंदिर परिसरातील पाझर तलावा जवळील शेतात  खतासाठी बसवलेल्या मेंढ्यांच्या लहान पिल्लांवर  बिबट्याने हल्ला केला आहे. श्रीकांत जयसिंग पाटील याचे पाझर तलावाजवळ कुरणाची टेकी नावाच्या शिवारात शेत आहे. या शेतात दोन दिवसापासुन खतासाठी मेंढ्या बसवल्या होत्या. यावेळी रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात २० मेंढरं ठार तर ४ गायब झाली आहेत. या घटनेने मेंढपाळचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिवसभर तिघे मेंढपाळ मोठ्या मेंढ्या शिवारात चरण्यासाठी घेऊन गेले होते, तर लहान पिल्ले शेतातच तारेचे तात्पुरते संरक्षक कुंपन बनवून त्यामध्ये ठेवली होती. त्यांच्या राखणीसाठी मेंढ्यांचे मालक सुभाष तुकाराम तांदळे  हे दिवसभर थांबले होते. ते रात्री जेवण घेऊन येण्यासाठी रेड या गावाकडे गेले होते. नेमक्या या संधीचा फायदा घेऊन शेजारच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संरक्षक तारेच्या कुंपनावरून उडी मारून पिल्लांवर हल्ला केला. या झटापटीत मेंढ्यांचा आवाज ऐकुन शेतमालक श्रीकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतल्याबरोबर बिबट्या पळुन गेला.  तर या हल्ल्यात २० पिल्ले मृत पावली आहेत तर ४ पिल्ले बिबट्याने ऊसात पळवुन नेली आहेत.

घटनेची माहिती वनविभागास कळविण्यात आली त्यानुसार निवासी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनरक्षक बाबा गायकवाड व संबधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.