Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणे बाबत अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 25 जुलै : महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय दिनांक १९ जानेवारी, २०१८ अन्वये राज्यातील ग्रामिण व शहरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकिय व खाजगी सेवा पोहचविण्याकरीता प्रत्येक ग्राम पंचायतस्तरावर व नगर परिषद, नगर पंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे असल्यामुळे, गडचिरोली जिल्हयातील रिक्त असलेल्या ३४३ ग्रामपंचायतस्तरावर व ०३ नगर पंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र रिक्त असल्याने महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय दिनांक १९ जानेवारी, २०१८ च्या परिच्छेद १ (अ) व (आ) मधिल निकषानुसार ग्राम पंचायतस्तरावर ३५१ व नगर पंचायतस्तरावर ०३ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे आहे.

करीता आपले सरकार सेवा केंद्र अर्ज स्विकारण्याची दिनांक २५/०७/२०२२ पर्यंत देण्यात आली होती परंतु जिल्हयात निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे अपेक्षित अर्ज संख्या प्राप्त न झाल्याने अर्ज सादर करण्यास दिनांक ०५/०८/२०२२ पर्यंत मुदत वाढवून देण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांकडून दिनांक ०५/०८/२०२२ चे कार्यालयीन वेळेपर्यंत अर्ज स्विकृत करण्यात येतील. गडचिरोली जिल्हयात रिक्त असलेल्या ३४३ ग्राम पंचायत व ०३ नगर पंचायतची यादी व अर्जाचा नमुना, जिल्हयाच्या वेबसाईट www.gadchiroli.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आरक्षण निश्चित करण्याकरीता

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

9 महानगरपालिकांच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्टला प्रसिद्ध होणार..

Comments are closed.