Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संस्थात्मक नवोपक्रम परीषदेद्वारा व्याख्यान माला संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 26 जुलै :-  विद्यापीठ परिक्षेत्र अंतर्गत युवक-युवतींकरिता रोजगार संबंधी उद्योजकता निर्माण करण्या हेतू तसे पोषक वातावरण निर्मिती करणे आवश्यक असते. या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठा ने भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अधिनस्त गोंडवाना विद्यापीठाच्या संस्थात्मक नवोपक्रम परिषदेचे गठण केले. त्या अंतर्गत विद्यापीठ परिक्षेत्रातील युवकांकरिता त्यांच्या कडील नवसंकल्पनेला प्रसूत करून नवउद्योजक निर्माण करण्याहेतू परिणामकारक व्याख्यान मालेचे आयोजन नूकतेच करण्यात आले होते.

या व्याख्यानमालेत रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे स्वतंत्र संचालक डॉ. अभय देशमुख यांनी ‘स्टॉर्ट अपचे इकोसिस्टिम आणि स्टॉर्टअपचे व्यवस्थापन ‘ या विषयावर तर ‘नवउद्योजकता मध्ये आशाटेक ऑटोमेशनचा प्रवास ‘ याविषयी ऑटोमेशन प्रा. लि. चे हर्षद वारसुले यांची व्याख्याने झाली. संस्थापक नवउपक्रम परिषदेचे अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात सदर व्याख्यानमाला घेण्यात आली.
दूरद्श्यप्रणालीद्वारे हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाकरिता प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक नवउपक्रम परिषदेचे समन्वयक तथा संचालक न.न.व.सा. डॉ. मनिष उत्तरवार यांनी परिश्रम घेतले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- 

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.