Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शाळेत फुलोरा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा – कुमुद भराडे

चंद्रा येथे तिसरी शिक्षण परिषद संपन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. २ मार्च :  तालुका मुख्यालयापासुन २५ किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या पेरमिली केंद्रातील दुर्गम भागातील जि.प.प्राथमिक शाळा चंद्रा येथे तिसरी शिक्षण परिषद नुकतीच संपन्न झाली.या परिषदेचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष सुधाकर वेलादी तर प्रमुख उपस्थिती केंद्र प्रमुख कुमुद भराडे, उपाध्यक्ष गणेश सिंगरेड्डीवार, तालुका फुलोरा समन्वयक दिगांबर दुर्गे,साधन व्यक्ती किशोर मेश्राम,ज्ञानेश्वर कापगते यांची होती.

विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्याना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळायला हवे.सर्वच मुले हसत खेळत व आनंददायी शिक्षण घेण्यासाठी शिक्षण विभागाने सुरु केलेला “फुलोरा” हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त आहे.म्हणून फुलोरा उपक्रमाची शाळांमधून शिक्षकांनी अंमलबजावणी करावी असे आवाहन केंद्र प्रमुख कु. कुमुद भराडे यांनी केले.त्या शिक्षण परिषदेत शिक्षकांना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फुलोरा उपक्रमातुन कौशल्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचा उपयोग करुन प्रत्यक्ष कृतीतून शिक्षकांनी अध्यापण करावे.भाषा व गणित या विषयासाठी हा उपक्रम फार उपयुक्त आहे.असे मार्गदर्शन फुलोरा तालुका समन्वयक दिगांबर दुर्गे यांनी केले.व
फुलोरा उपक्रमाचे कृतीवर आधारीत भाषा व गणित विषयाची तासिका त्यांनी घेतली.

*साधन व्यक्ती कीशोर मेश्राम,ज्ञानेश्वर कापगते व पदवीधर शिक्षक अनिल चांदेकर यांनी निपुन भारत,निष्ठा प्रशिक्षण व रिड टु मी याबाबतचे मार्गदर्शन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाचे संचालन संतोष चिकाटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डी.एस दुर्गे यांनी मानले. या शिक्षण परिषदेचा लाभ पेरमिली केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी घेतला.

हे देखील वाचा : 

पबजी खेळाच्या वादातून 20 वर्षीय तरुणाचा खून

जयंत पाटील यांनी दिलेला शब्दही पाळला अन् साबुदाणा वडाही चाखला; महिला पदाधिकाऱ्याच्या धाडसाचे जयंत पाटलाकडून कौतुक

विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

 

Comments are closed.