Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनविभागाच्या अनास्थेमुळे वनजमीनीवरील हजारो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन – संतोष ताटीकोंडावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. १६ जून : भामरागड वनविभागांतर्गत येत असलेल्या बोटनफुंडी-नारगुंडा रस्ता खडीकरणाच्या बांधकामात संबंधित कंत्राटदाराद्वारे अवैधरित्या वन जमिनीवरील हजारो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करुन वापर केला जात आहे. वनविभागाच्या अधिका-यांसह कर्मचा-यांनी मात्र याकडे कानाडोळा केला आहे. वनविभागाच्या बेजबाबदारपणा कंत्राटदाराच्या पथ्यावर पडला असून यामुळे मात्र लाखो रुपये किंमतीची वनसंपदा नष्ट होण्याचा धोका बळावला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत भामरागड वनविभागांतर्गत येत असलेल्या बोटनफुडी-नारगुंडा मार्गाचे अंदाजे 35-40 कोटी निधी अंतर्गत खडिकरणाचे काम सुरु आहे. संबंधित कंत्राटदाराद्वारे या रस्ता बांधकामात रस्त्याच्या बाजुलाच लागून असलेल्या वनातील मुरुमाची बेकायदेशीरित्या उत्खनन करुन रस्ता कामात मुरुमाचा वापर केल्या जात आहे. वनविभागाची कुठलिही परवानगी न घेता शासकीय नियमांना डावलून कंत्राटदाराद्वारे हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या अवैध उत्खननामुळे मौल्यवान अनेक सागवनाच्या मुळांना आघात झालेला आहे. जमीन उत्खनन केल्यामुळे पावसाळ्यात ही झाडे पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राजरोसपणे कंत्राटदारामार्फत वनजमीनीचे उत्खनन करुन हजारो ब्रास मुरुम रस्ता बांधकामात वापरला जात असतांना वनविभाग प्रशासनाच्या कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वनविभागाच्या या निष्काळजीपणामुळे वन जमिनीवर मौल्यवान वनसंपतीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.

बेजबाबदार कर्मचा-यांवर कठोर कारवाई करा : ताटीकोंडावार
भामरागड वनविभागांतर्गत येत असलेल्या सदर मार्गाच्या बांधकामात बेकायदेशिररित्या वनजमीनीचे उत्खनन करुन मुरुमाचा राजरासेपणे वापर केल्या जात आहे. मात्र याकडे वनविभागाद्वारे अक्षम्य दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे संबंधित विभागातील बेजबाबदार कर्मचा-यांवर कारवाई करुन संबंधित कंत्राटदारावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भष्टाचार निवार समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक (प्रादेशिक) यांचेकडे तक्रारीतून केली आहे.

हे देखील वाचा : 

महाराष्ट्राच्या ‘क्रांती गाथा दालन’ व ‘जलभूषण’ या वास्तू प्रेरणा देणाऱ्या ठरतील

Comments are closed.