Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विम्याचे १ कोटी लाटण्यासाठी पत्नीने सुपारी घेऊन पतीचा काढला काटा

बीडच्या पिंपरगव्हान रस्त्यावरील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • १०  लाखात दिली सुपारी ; २ लाख दिला इसार.
  • आरोपी पत्नीसह दोघांना अटक तर दोघांचा शोध सुरू.

बीड, दि. १३ जून : बीडमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. एक कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी, चक्क एका महिलेने सुपारी देऊन पतीचा काटा काढलाय. डोक्यात टामीने मारून हत्या केल्यानंतर, मारेकऱ्यांनी अपघात झाल्याचं भासविलं. मात्र बीड पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन चित्रपटाला साजेल अशा पद्धतीने घातपात केलेल्या घटनेचा उलगडा केला आहे. मंचक गोविंद पवार असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपी पत्नी गंगाबाई मंचक पवार अन्य ५ जणांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

११ जून रोजी पहाटे मंचक पवार यांचा मृतदेह अहमदनगर महामार्गावरील बीड पिंपरगव्हाण रस्त्यावर आढळून आला होता. यामध्ये स्कुटीला वाहनाने धडक दिल्यासारखा अपघात झाल्याचं भासविण्यात आलं होतं. तर यादरम्यान पत्नीच्या चेहऱ्यावर काहीच दुःख नसल्याचं दिसून आल्याने पोलिसांना घातपाताचा संशय आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मयत मंचक पवार यांच्या पत्नीनेच, पतीच्या नावाने काढलेला १ कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी, १० लाख रुपयांची दिली. त्यापैकी २ लाख रुपये इसार म्हणून मारेकऱ्यांना देऊन पती मंचक यांचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान याप्रकरणी आरोपी पत्नी गंगाबाई मंचक पवार (३७), रा . वाला , ता . रेणापूर जि . लातूर , हमु . अंकुशनगर , बीड, श्रीकृष्ण सखाराम बागला (२७),  रा. काकडहिरा ता.बीड, सोमेश्वर वैजीनाथ गव्हाणे (४७), रा . पारगाव सिरस ता.बीड व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील पत्नीसह ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सुपारी घेणाऱ्या फरार दोघांचा तपास सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

स्वतःला ओळखा आणि पुढे जा, यशाची सोनेरी दारे तुमची वाट पाहत आहेत – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

गडचिरोली नगर परिषदेचे आरक्षण जाहिर

 

 

Comments are closed.