Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय सेवा योजना एक युवा चळवळ : डॉ. श्याम खंडारे

विविध विषयांवर झाले व्याख्यान व चर्चासत्र.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली दि. ७ एप्रिल : आपल्या देशाचा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. राष्ट्रीय सेवा योजना एक युवा चळवळ आहे. असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. श्याम खंडारे यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजनाद्वारा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मुरखळा येथे ” राष्ट्रनिर्मितीकरिता युवाशक्ती ” या विषयावर आयोजित विशेष वार्षिक शिबिर 2022च्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, पदव्युत्तर शैक्षणिक विभाग , डॉ. प्रमोद जावरे ,सहकार्यक्रम अधिकारी वैभव मसराम, प्रा. डॉ. शिल्पा आठवल्ये आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुढे बोलताना डॉ. श्याम खंडारे म्हणाले , युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असताना दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य विद्यापीठ स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय.
या पाच दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यी दर दिवसाची सुरुवात प्रार्थना आणि त्यानंतर योगासनाने करायचे. स्वच्छता अभियान , अधंश्रधा निर्मुलनाकरिता जनजागृती , विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील राबवले. ज्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला.

या शिबिरात व्याख्यान व चर्चासत्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. २ एप्रिलला ” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व युवकांची भूमिका” याविषयी डॉ. नरेश मडावी, त्यानंतर “विद्यार्थी विकास योजना” याविषयी डॉ. शिवाजी चेपटे, “व्यवसायातून रोजगार निर्मिती” याविषयी डॉ. प्रशांत सोनवणे , “पर्यावरण संरक्षण” याविषयी संदीप कागे, 3 एप्रिलला “सामाजिक सुरक्षिततेत महिलांची भूमिका” याविषयी डॉ.रजनी वाढई, “वैज्ञानिक दृष्टिकोन काळाची गरज “या विषयावर डॉ. शिल्पा आठवले , “सॉफ्ट स्किलची गरज” याविषयी डॉ.अनिरुद्ध गचके, दिनांक ४ एप्रिलला ” व्यक्तिमत्व विकासात योगाची भूमिका” याविषयी डॉ. प्रिया गेडाम ,”आजचा युवक व व्यसनाधीनता “याविषयी डॉ. प्रीती पाटील काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

समारोपाच्या कार्यक्रमाचे संचालन वैभव मसराम तर आभार डॉ.प्रमोद जावरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावकरी ,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ,शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा : 

गडचिरोली जिल्ह्यात आता ब्लॉकचेन प्रणालीद्वारे जात प्रमाणपत्रे निर्गमित होणार

 

Comments are closed.