Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे, कॉपीबहाद्दरांवर कारवाई होणारच – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चिपळूण, दि. १९ फेब्रुवारी :  “जर ऑनलाइन परीक्षांमध्ये कॉपी करण्याचे प्रमाण वाढत असेल आणि ते जर पुराव्यानिशी सिद्ध झाल्याच्या तक्रारी आल्या, तर त्या विद्यार्थ्यांवर नक्की कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांना वाटत असेल तर ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे. हा विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे, असं वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेला आहे. चिपळूणमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे, कॉपीबहाद्दरांवर कारवाई होणारच

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऑनलाइन परीक्षेत कॉपीबहाद्दरांचा प्रकरण समोर आल्यानंतर ऑफलाइन देखील परीक्षा आम्हाला सुरू करावे लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट ऑनलाईन परीक्षेत कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, त्याच्यामध्ये कोचिंग क्लासेस ग्रुप असुदे, वैयक्तिक असूदेत कोणीही असू देत..तो कॉपीला प्रवृत्त करत असेल तर त्याच्यावर पोलिस कारवाई होणारच असे सामंत म्हणाले.

ऑनलाइन परीक्षा पूर्ण बंद करता येणार नाही
ऑनलाइन परीक्षा बंद करण्याचा काही प्रश्न येत नाही, ऑनलाईन परीक्षा या ऑनलाईन जाहीर केलेल्या आहेत. एका ठिकाणी असं घडलं म्हणजे सगळी कडे होतय असा भाग आहे. पण ज्या ठिकाणी होते तिथे कारवाई केली जाणार.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, दोन जवान शहीद

देशसेवा बजावत असतांना राष्ट्रीय रायफलचे जवान रोहित चव्हाण यांना वीरमरण

महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण

 

 

Comments are closed.