Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघर जुळ्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू; जनहित याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने घेतली दखल

सेवा न देणाऱ्या सरकारी डॉक्टरांवर कारवाई केली जाईल - सरकारी वकील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर, दि. १८ ऑगस्ट : पालघर जिल्ह्यातील महिलेच्या जुळ्या बालकांचा वैद्यकीय सेवेअभावी मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेची बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर घेतली आहे. या घटनेचे वृत्त लोकस्पर्श न्यूजने देऊन दखल घेतली होती. मेळघाट येथील सामाजिक कार्यकर्ते बंडू साने यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

कुपोषणामुळे बालकांचे होणारे मृत्यू, गर्भवती महिला आणि स्तनदा माता दगावण्याची संख्या काही केल्या कमी होत नसल्याबद्दल या याचिकेवर हायकोर्टानं चिंता व्यक्त केली. आदिवासी भागांत आजही मुलभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. या भागात सेवा देण्यासाठी राज्य सरकारनं नियुक्त केलेले डॉक्टर कामावर रुजूच होत नाहीत, असा आरोप याचिकाकेत केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यावर जर डॉक्टर नियुक्त केलेल्या भागात रुजू झाले नाहीत तर त्यांना नोटीस बजावली जाईल आणि त्यांनी प्रतिसाद न दिल्यास डॉक्टरांना सेवेतून काढून टाकले जाईल, असं सरकारी वकील पी. पी. काकडे यांनी खंडपीठाला सांगितले. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी १२ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Maha Assembly Session:शिंदे सरकारने सादर केल्या तब्बल २५ हजार ८०० कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या

 

 

Comments are closed.