Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वसईत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्कूल बस ला अपघात ! 

चालकाच्या प्रसंगावधानाने ५० विध्यार्थी बचावले !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वसई, दि. १७ ऑगस्ट : वसईत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एक मोठी दुर्घटना घडणार होती मात्र, दैव बलवत्तर आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे ५० विद्यार्थी सुखरुप बचावले. वसईतील ‘अवर लेडी ऑफ वेलंकणी’ या शाळेच्या मुलांना घेऊन घरी सोडण्यासाठी जात असताना, नायगाव पूर्वेला तिवरी फाट्याजवळ एका खड्यात ही बस कलंडली. त्यावेळी प्रसंगवधान दाखवत चालकाने त्वरित बसवर ताबा मिळवून बस थांबवली. यावेळी बस मध्ये अडकलेल्या ५० मुलांना 

आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आपत्कालीन दरवाजातून मुलांना लोकांनी सुखरूप बाहेर काढले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बसला अपघात झाला तेव्हा बसमध्ये ५० मुले होती. सर्व मुले सुखरून असून, त्यांना दुसरी बस बोलावून या मुलांना त्यांच्या – त्यांच्या घरी सोडण्यात आले. दरम्यान रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि क्षमतेपेक्षा जास्त मुले बस, रिक्षा किंवा व्हेन मध्ये कोंबून शाळा देखील मुलांच्या जीवाशी खेळताहेत. त्यामुळे हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून या बाबत प्रशासनाने गंभीर दखल घेऊन सर्वंकष मार्ग काढणे आवश्यक झाले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Maha Assembly Session:शिंदे सरकारने सादर केल्या तब्बल २५ हजार ८०० कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या

पालघर जुळ्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू; जनहित याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने घेतली दखल

Comments are closed.