Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

५ जून दिनविशेष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आजचे पंचांग (शनिवार, जून ५, २०२१) युगाब्द :५१२३
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक ज्येष्ठय १५ शके १९४३
सूर्योदय : ०५:५७ सूर्यास्त : १९:०९
चंद्रोदय : ०३:०९, जून ०६ चंद्रास्त : १५:०४
शक सम्वत : १९४३ प्लव
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अपरा एकादशी – पूर्ण रात्रि पर्यंत
नक्षत्र : रेवती – २३:२८ पर्यंत
योग : सौभाग्य – ०३:३६, जून ०६ पर्यंत
करण : बव – १७:१० पर्यंत
द्वितीय करण : बालव – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : मीन – २३:२८ पर्यंत
राहुकाल : ०९:१५ ते १०:५४
गुलिक काल : ०५:५७ ते ०७:३६
यमगण्ड : १४:१२ ते १५:५१
अभिजितमुहूर्त : १२:०७ ते १३:००
दुर्मुहूर्त : ०५:५७ ते ०६:५०
दुर्मुहूर्त : ०६:५० ते ०७:४३
अमृत काल : २०:४८ ते २२:३५
वर्ज्य : १०:०८ ते ११:५४

“आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय – स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे.”
आज जागतिक पर्यावरण दिन आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

|| चाहिये आशिश माधव नम्र गुरुवर प्रार्थना ॥

हिंदुत्ववादी स्वातंत्र्यसेनानी पं.मदनमोहन मालवीय यांनी स्थापन केलेल्या बनारस हिंदू विद्यापीठातून गोळवलकर गुरुजींनी प्राणीशास्त्रात (झूलॉजी) प्रथम श्रेणीत एम.एस्सी. ची पदवी संपादन केली. तसेच नागपूर विद्यापीठातून १९३५ मध्ये कायद्याची पदवी देखील मिळवली. कालांतराने गोळवलकरांची डॉ. हेडगेवारांशी भेट झाली आणि डॉक्टरांच्या प्रेरणेने ते संघकार्यात अधिक सक्रीय झाले. संघाच्या सरकार्यवाहपदी गोळवलकर गुरुजींची १९३९ मध्ये नियुक्ती करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दुर्दैवाने डॉ. हेडगेवार यांचा २१ जून १९४० रोजी स्वर्गवास झाला. आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून श्रीगुरुजींची सरसंघचालकपदी निवड करण्यात आली. स्वतः डॉ. हेडगेवारांनीच मृत्युपूर्वी एका पत्रात तशी इच्छा लिहून ठेवली होती. 33 वर्षे श्रीगुरुजींनी संघाची धुरा वाहिली. या प्रदीर्घ काळात त्यांनी संघाचे ‘हिंदूंची सामाजिक – सांस्कृतिक संघटना’ हे स्वरूप व्यापक केले. समाजजीवनाच्या अनेकविध क्षेत्रात त्यांनी एक विचाराने काम करणाऱ्या संस्था उभारल्या. ‘संघ परिवार’ हीच आज या सर्व संस्थांची सामुहिक ओळख आहे.

• १९७३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०६)

श्रीबाळकृष्ण महाराज सुरतकर. –

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ अलिकडे दादर मठ नावाने ओळखला जातो श्री सद्ग़ुरु बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला. श्री बाळकृष्ण महाराज यांचा जन्म सुरत येथे २८ ऑक्टोबर १८६६ साली झाला. लहानपणापासूनच त्यांना देवभक्तीची व नामस्मरणाची आवड होती. पुढे ते आपले चुलते शिवशंकर यांचे कडे मुंबईला शिक्षणासाठी आले. मुंबईस आल्यावर त्यांच्यावर आर्यसमाजाच्या शिकवणीचा पगडा बसला. त्यांचे चुलते शिवशंकर कट्टर शिवभक्त त्यांना या गोष्टीचे दुःख झाले त्यांचे शेजारी श्री रामचंन्द्र व्यंकटेश बरडकर उर्फ़ सारस्वत ब्रांम्हण भेंडे, हे महाराजांचे गुरु “तात महाराज” श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त रहात असत.

त्यांना महाराजांच्यात सुधारणा करण्यास त्यांनी विनंती केली. त्यांनी श्री सदगुरु बाळ्कॄष्ण महाराजांना भुलेष्वरच्या अष्टभुजादेवीच्या देवळात देवीचे हास्यमुखाचे दर्शन देऊन त्यांच्या वूत्तीमध्ये आमुलाग्र फ़रक केला गेला व त्याचक्षणी माहाराजांनी श्री तातमाहाराजांना गुरु करुन ते श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त बनले. महाराजांना इंग्रजी व संस्कृतचे उत्तम ज्ञान होते.

सन १९१० तीन खुनी बंगल्यामध्ये मठ स्थापन झाला. हा बंगला खूपच जुना असल्याने कालांतराने बंगल्याचे दुरुस्तीचे काम करण्यास सुरु केले. सिंहासनाच्या बैठकीत स्वामी समर्थांचे अवशेष घालुन त्यावर संगमरवरी लादी बसवुन समर्थांच्या फोटोची स्थापना केली.

दादर मठाच्या स्थापनेनंतर सन १९११ मध्ये वडवली शेरी बेगमपुरा सुरत येथे सुद्धा महाराजांनी श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला. त्या मठात श्री स्वामी समर्थांचा पलंग श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन आणली, ती त्या मठातील गाभार्यात ठेवलेली आहे.
महाराज नेहमी श्री स्वामी समर्थांची पुण्यतीथीची पालखी मुंबईस काढून दुसरे दिवशी तशीच पालखी सुरतेस काढण्यास जात असत,

वैशाख वद्य दशमी शके १८४० संवत १९७४ तारीख ४ जून १९१८ मंगळवार रात्रौ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरतेच्या मठात भजनाचा कार्यक्रम होत असताना महाराजांनी तो बंद करून सर्वाना घरी जाण्यास सांगितले.परंतु एक तासाने यावे लागेल असे म्हणाले. त्यांचा अर्थ त्यावेळी कोणालाही कळला नाही. वैशाख वद्य एकादशी शके १८४० संवत १९७४ बुधवार, तारीख ५ जून १९१८ रोजी सूर्योदयी निर्वाणास गेले.

अशा या सदगुरू बाळकृष्ण महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.

• १९१८ : श्री अक्कलकोटस्त परब्रह्म श्री स्वामी समर्थांच्या प्रभावळीतील अद्वितीय असे रत्न श्रीबाळकृष्ण महाराज सुरतकर. श्रीबाळकृष्ण महाराज हे आपल्या सर्वांना अतिप्रिय व सर्वश्रुत असलेल्या दादर येथील स्वामी मठाचे संस्थापक यांचा देहत्याग (सूर्योदयी वैशाख कृ.एकादशी शके १८४० संवत १९७४) (जन्म : २८ ऑक्टोबर १८६६ )

* घटना :
१९५९: सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.
१९६८: अमेरिकेच्या अध्यक्षपदचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांचा गोळी मारण्यात आली, पुढील दिवशी केनेडी मरण पावले.
१९७५: सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
१९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
१९९४: वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
२००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.

• मृत्यू :
• २०११ : कुस्तीगीर व प्रशिक्षक रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १९५०)
• १९९६: भारतीय कवि आणि विद्वान आचार्य कुबेर नाथ राय यांचे निधन. (जन्म: २६ मार्च, १९३३)
• १९९९: राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले यांचे निधन.

* जन्म :
१८७९: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे , १९५५)
१८८१: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर , १९५५)
१९०८: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर, १९९१)
१९६१: भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक पद्म श्री रमेश कृष्णन यांचा जन्म.
१९७२: भारतीय पुजारी आणि राजकारणी उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्म.

 

 

Comments are closed.