Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डहाणूच्या शुभम धनंजय वनमाळी या जलतरणपटूचा राष्ट्रपतीं कडून सन्मान

शुभम वनमाळी तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मनोज सातवी  पालघर 1 डिसेंबर :-  पालघर मधील डहाणूचा आंतरराष्ट्रीय जलतरणपट्टू, शिवछत्रपती पुरस्कार विजेता शुभम वनमाळी याला भारत सरकारच्या युवा कार्यक्रम-खेल मंत्रालयातर्फे दिला जाणारा साहसी क्रीडा प्रकारातील सर्वोच्च असा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शुभमला समुद्रातील साहसासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी नयना धाकड यांना जमिनीवरील साहसासाठी , तर ग्रुप कॅप्टन कुंवर भवानी सिंह सम्याल यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

शुभम वनमाळी याने आतपर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण मोहीम पार पाडून अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी, कॅटालिना खाडी, मॅनहॅटन मॅरेथॉन स्विम, गेट वे ऑफ इंडिया ते धरतमतर, गेट वे ऑफ इंडिया ते डहाणू बीच अशा अनेक सागरी मोहिमा पोहून फत्ते केलेल्या आहेत. त्याचबरोबर ग्रँड डब्लिन स्विम, आयरिश नॅशनल स्विम या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागरी स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शुभम वनमाळी याने आजपर्यंत केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारच्या युवा कार्यक्रम-खेल मंत्रालयाने त्याला तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याच्या वरोर गावतला शुभम वनमाळी रहिवासी आहे. त्याचे वडील व आजोबांची कर्मभूमी या तालुक्यातील कासा गावातील आहे. शुभमच्या या सन्मानामुळे पालघर जिल्ह्यासह राज्यभरातून शुभम वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हे पण वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.