Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय स्टेट बँकेच्या कोरची येथील ग्राहक सेवा केंद्रामध्ये 4 लाख 95 हजार अफरातफर

कोरची पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल दोन आरोपींना अटक न्यायालयाकडून पोलीस कोठडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कोरची, 02, डिसेंबर :- कुरखेडा येथील भारतीय स्टेट बँकेने कोरची तालुक्यात असलेल्या ग्राहकांना सेवा मिळण्यासाठी सुरू केलेल्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये ग्राहकांची 4 लाख 95 हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन केंद्र संचालकावरती कोरची पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सविस्तर वृत्त घटना ता. वेळी व ठिकाणी यातील आरोपीतांनी आपनास संगणमत करून बँकेने फिर्यादिस विश्वासाने ग्राहक सेवा केंद्र चालविण्याकरीता दिले असता आरोपितांनी ग्राहक सेवा केंद्रावर खातेधारकांच्या ठेविवर स्वताचे आर्थिक फायद्यासाठी अप्रामाणिकपणे व्यवहार करून बनावट आरडी खाते पासबुक तयार करुन त्यावर बनावट खाते क्रंमाक लिहुन खातेदारानी जमा केलेली रक्कम हि स्वताजवळ ठेवुन खातेधारकाच्या पैशाचा अपहार करुन खातेधारकाची एकुन 4,95,000 रुपयाची फसवनुक केले आहे. अशी नंदकिशोर सदानंद कावळे वय 30 सेल्स मॅनेजर पेपाॅईट इंडिया नेटवर्कर प्रायव्हेट लिमिटेड नागपूर फिर्यादिचे तोंडी रिपोर्ट वरुन संजित अशोक सरदारे वय 29 राहणार नानही तालुका कुरखेडा, विरेंद्र टेंभुर्णे कोसमी तालुका कोरची कलम 409,420,465,467,468,471,,34भादवी कलमा अन्वये गुन्हा नोंद करुन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरची तालुक्यात133 गावे असून राष्ट्रीय कृत बँक ऑफ इंडियाची एकच शाखा असून कुरखेडा येथील भारतीय स्टेट बँकेचे बरेच खातेदार खुर्ची तालुक्यात आहेत ही बाब लक्षात घेऊन भारतीय स्टेट बँकेने कोरची येथे स्टेट बँकेची शाखा उघडण्यापेक्षा भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र उघडण्यात आले होते पण हे ग्राहक सेवा केंद्र ग्राहकांना नेहमीच मनस्ताप निर्माण करणारे ठरले त्यामुळे भारतीय स्टेट बँकेची शाखा कोरची येथे उघडण्यात यावी असे मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या अगोदर केलेली आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग विभागीय पोलीस अधिकारी महेश झरकर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल फरतडे तपास करीत आहेत.कोरची पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल फरतडे यांनी भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये ज्या ज्या लोकांनी व्यवहार केले आणि त्यांच्या व्यवहाराचे पैसे अजून पर्यंत मिळाले नाही त्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन लिखित पुराव्यासह तक्रार देण्याची आव्हान केले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डहाणूच्या शुभम धनंजय वनमाळी या जलतरणपटूचा राष्ट्रपतीं कडून सन्मान

चला जाणुया नदीला अभियानांतर्गत नद्यांचे आराखडे तयार होणार

Comments are closed.