Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आर्थिक विवंचना व्यापाऱ्यांना ठरते का जीवघेणी?

कोरची येथील व्यावसायिक मुकेश निनावे संशयास्पदरीत्या बेपत्ता...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कोरची 23 जुलै : नागपूर येथील  एका व्यापाऱ्याने आर्थिक तंगीतून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच गड़चिरोली च्या कोरची येथील व्यापारी संशयास्पदरीत्या  बेपत्ता  झाला आहे.   मुकेश निनावे असे या व्यापाऱ्याचे नाव  असून तो  आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती समोर  आली आहे. शुक्रवार पासून निनावे यांचा  संपर्क होत नसल्यामुळे  कुटुंबियांनी  पोलिसात धाव घेतली आहे.

कोरची येथील व्यापारी  निरंकारी जनरल  स्टोअर्सचे मालक मुकेश  निनावे शुक्रवार पासून बेपत्ता झाले आहेत. गेल्या  काही  दिवसांपासून मुकेश निनावे आर्थिक अडचणीत असल्याचे माहिती समोर  आली आहे, त्यामुळे त्यांनी नैराश्यातून टोकाचे पाउल उचलले तर नाही ना ? असे  भिती व्यक्त होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शुक्रवार  मुकेश  यांनी  आपली मोटारसायकल  कोरची येथे उभी करून येथील एका मिठाईच्या दुकानात मोबाईल ठेऊन वडसा येथे जात असल्याने सांगितले होते. परंतु  वडसा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर मुकेश यांच्या  अंगावरील कपडे,चष्मा, पाकीट, याच सोबत एक सुसाइट नोट सापडली होती . शिवाय याच वेळेस आपल्या  पत्नीला  फोन  करून आपन जीवनयात्रा संपवित असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मुकेश यांनी आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल तर उचलले नाही ना?अशी  भीती  व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी मुकेश यांच्या पत्नीच्या  तक्रारीवरून कोरची आणि  वडसा पोलीस तपास करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :- 

गडचिरोली ला स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षणातून वगळल्याने ओबीसीत तीव्र नाराजी..

 

आरोग्य विभागाने औषधी भांडार निर्माण करावा; उमाजी गोवर्धन यांची मागणी

Comments are closed.