Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी! आजवरचा सर्वात मोठा अपघात.ओडिशा रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू तर ९००हून अधिक जण जखमी

आकडा वाढण्याची शक्यता

 

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

बालासोर (ओडिशा), 3 जून – ओडिशातील  बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (2 जून) संध्याकाळीत साडेसातच्या सुमारास तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ट्रेन क्रमांक 12841 कोरोमंडल एक्सप्रेस शालीमार (पश्चिम बंगाल) रेल्वे स्थानकावरून चेन्नई सेंट्रलपर्यंत प्रवास करते. ही ट्रेन 25 तासांत 1659 किलोमीटर अंतर कापते. शुक्रवारी, कोरोमंडल एक्सप्रेसनं शालिमार स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून 10 मिनिटं उशीर केला. काही मिनिटांनी ट्रेननं उशीर झालेला वेळ कव्हर केला. मात्र त्यानंतर साधारण 253 किमी अंतरावरील बहंगा बाजार स्थानकाजवळ काळानं घाला घातला आणि ट्रेनचा भीषण अपघात झाला.

ही धडक इतकी जोरदार होती की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण 15 डब्बे पटरीच्या बाहेर होते. या दुर्देवी आणि भयंकर अपघातातील मृतांची संख्या 233 वर पोहोचली आहे. तसेच अपघातात आतापर्यंत 900 प्रवासी जखमी झाले आहेत. कालपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी 
  • हावडा : 033 – 26382217
  • खडगपूर : 8972073925, 9332392339
  • बालासोर : 8249591559, 7978418322
  • शालीमार (कोलकाता) : 9903370746
  • रेलमदद : 044- 2535 4771

या अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्च समिती गठीत
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सकाळी दुर्घटनास्थळी जाऊन परिस्थीतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अपघातासंबंधी माहिती दिली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या प्रकारचा मोठा पहिल्यांदा झाला आहे. त्यामुळे जेवढे प्रयत्न करू तेवढे कमी आहेत. या अपघात मृत्यू झालेल्या नागरिकांसाठी मी प्रार्थना करतो आणि सर्व जखमी झालेल्या नागरिकांना कटक, भुवनेश्वर, कलकत्ता कुठेही जिथे चांगली आरोग्य सेवा दिली जाईल. या अपघातात जखमी आणि मृत्यू नागरिकांसाठी काल रात्रीच मदत जाहीर करण्यात आली आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.