Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी,एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर,राज्य सेवा परीक्षेच्या १०० जागामध्ये वाढ.

एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये १०० पदं वाढल्यामुळं ३९० पदांसाठी २ जानेवारी २०२२ ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात येईल .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे डेस्क,दि ८ ऑक्टोबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा २०२१ अंतर्गत २९० पदांसाठी १६ संवर्गात भरती करण्यात येणार आहे.

एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आल्याने १०० पदं वाढल्यामुळं आता ३९० पदांसाठी ०२ जानेवारी २०२२ ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार असल्याने विद्यार्थ्यांत आनंदाच वातावरण निर्माण झाले आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एमपीएससीकडून नवं परिपत्रक जाहीर.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एमपीएससीकडून परीक्षेचं वेळापत्रक कसे राहणार ?
एमपीएससीकडून पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य परीक्षा दिनांक ७,८ आणि ९ मे, २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. २०२१च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास ०५ ऑक्टोबर दुपारी २ वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५४४ तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी ३४४ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे

१. उपजजिल्हाधिकारी १२, पद,

२. पोलीस उपअधीक्षक १६, पद,

३. सहकार राज्य कर आयुक्त १६ , पद,

४ गटविकास अधिकारी १५, पद,

५. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ १५, पद,

६.उद्योग उप संचालक ४, पद,

७.सहायक कामगार आयुक्त २२, पद,

८.उपशिक्षणाधिकारी २५, पद,

९.कक्ष अधिकारी ३९, पद,

१०.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४, पद,

११.सहायक गटविकास अधिकारी १७, पद,

१२.सहायक निबंधक सहकारी संस्था १८, पद,

१३.उपअधीक्षक भूमि अभिलेख १५ , पद,

१४. उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर १, पद,

१५. उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क १, पद,

१६.सहकारी कामगार अधिकारी ५४, पद,

१७. मुख्याधिकारी गट ब ७५, पद,

१८ . मुख्याधिकारी गट अ १५ पद,

१९. उपनिबंधक सहकारी संस्था गट अ १० पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

हे देखील वाचा ,

 

Comments are closed.