Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आंबेशिवणी, अमिर्झा येथे वन्यजीव सप्ताहानिमीत्त वन्यजीवांवर मार्गदर्शन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, दि. ६ ऑक्टोंबर : तालुक्यातील आमिर्झा, आंबेशिवणी येथे वन्यजिव सप्ताह आज ६ ऑक्टोबर २०२१ रोजी साजरा करण्यात आला.

दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजिव सप्ताह पाळत असतात. यानिमित्त आंबेशिवणी,अमिर्झा येथे वन्यजीवांवर मार्गदर्शन करण्यात आले.
गडचिरोली तालुक्यात मागील काही महिण्यांपासून वाघाच्या दहशत निर्माण झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तालुक्यातील अमिर्झा परिसरात आज गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजिव सप्ताहानिमित्य जनजागृतीपर कार्यक्रम आंबेशिवणी येथील विद्याभारती हायस्कूल येथे सकाळी ८ वाजता तसेच अमिर्झा येथे कर्मविर विद्यालय येथे सकाळी १० वाजता आायोजीत करण्यात आला होता.

यावेळी परिसरातील नागरिकांच्या मनातील वाघाविषयी असलेली भिती, वाघ आपला भक्षाची शिकार कशी करतो, वाघापासून मानवास धोका आहे काय, वाघाबाबत असलेला गैरसमज आदींवषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जंगलतील इतर वन्यजिवांबद्दल वनरक्षक एस.के.मेश्राम यांनी दिली.
त्यानंतर सर्पमित्र अजय कुकडकर यांनी सापांविषयी असलेला समज-गैरसमज, सापांविषयी माहिती व सापांची ओळख व नागरिकांच्या मनात असलेली भिती दुर करून साप हा आपला शत्रु नसून मित्र आहे, परिसरात साप आढळल्यास सापला न मारता जवळील सर्पमित्रास संपर्क करावे असे आवाहन सर्पमित्र अजय कुकडकर यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी चातगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.पडवे, अमिर्झाचे क्षेत्रसहाय्यक आर.एस.तांबे, गिलगावचे वनरक्षक एस.के.मेश्राम, आंबेशिवनीचे वनरक्षक आर.बी.दुर्गे, सर्पमित्र अजय कुकडकर, विद्याभारती हायस्कूल आंबेशिवणीचे मुख्याध्यापक जे.एस.खरवडे, कर्मविर विद्यालय अमिर्झाचे मुख्याध्यापक आर. डी. शेंडे, अमिर्झाचे वनरक्षक एस.आर.आंबेडारे, मिचगावचे वनरक्षक आर.एस.आनंदपवार, सर्पमित्र सौरभ सातपुते, चेतन शेंडे, हरिष निमगडे, योगेश हजारे, द्रोणाक्ष सातपुते आदी उपस्थित होते.

Comments are closed.