Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेनाप्रमुखांची सावली बनून राहिलेले चंपासिंह थापा शिंदे गटात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. २७ सप्टेंबरशिवसेना नेमकी कोणाची याचा वाद निवडणूक आयोगासमोर आणि सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तर, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि शिंदे गटात डाव-प्रतिडाव टाकला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका भावनिक डाव टाकला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू सहाय्यक आणि मातोश्रीचा सेवक अशी ओळख आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर थापा हे बाळासाहेबांची सावली झाले असे म्हटले जाते. नेपाळहून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सत्ताकारणात एक महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा मदतनीस होण्याचा प्रवासही वेगळा आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंपासिंह थापा हे जवळपास चार-पाच दशकांपूर्वी नेपाळमधून भारतात पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते. गोरेगावमध्ये लहान-सहान कामे करत असताना भांडूपमधील नगरसेवक के.टी. थापा यांच्यासह चंपासिह थापा मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर बाळासाहेबाना शांत चेहरा आणि भेदक नजर असलेला तरूण मातोश्रीवर थांबवून घेतला. १९८०-८५ पासून थापा हे बाळासाहेब ठाकरे यांचा खास विश्वासू मदतनीस झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा दिनक्रम सांभाळणे, त्यांची सेवा करणे याला थापा यांनी वाहून घेतले.

मीनाताई ठाकरे यांच्या अकाली निधनानंतर थापा यांनी बाळासाहेबांच्या औषधांच्या वेळा सांभाळणे, त्यांची सेवा करणे याला थापा यांनी वाहून घेतले होते. चंपासिह थापा हे मातोश्रीतील एक सदस्य झाले होते. मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीशेजारी त्यांची एक लहान खोली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा, जाहीर सभांमध्ये चंपासिंह थापा हे त्यांच्या सावलीसारखे दिसून यायचे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा: 

शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला ? भुजबळांच्या विधानावर नवा वाद ! 

मोठी बातमी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय रियाझ भाटी अटकेत

 

Comments are closed.