Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घ्यावी – सुप्रीम कोर्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नवी दिल्ली, दि. २७ सप्टेंबर :  ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई हायकोर्टाला दिले होते.

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर यापूर्वीच मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ती सुनावणी झाली होती. एका न्यायमूर्तींपुढं या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यानंतर प्रशासकीय कारणामुळं न्यायामू्र्ती बदलण्यात आले. पुढे एका न्यायमूर्तींनी अनिल देशुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं जामीन अर्जाचं प्रकरण प्रलंबित होतं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी होत नसल्यानं त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टानं आज मुंबई हायकोर्टाला अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत

सुप्रीम कोर्टानं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जामीन अर्जाची याचिका मुंबई हायकोर्टात गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं यापूर्वी जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अनिल देशमुख यांना मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठापुढं मंगळवारी अर्ज करण्यास परवानगी देण्यात आली आहे. न्यायमूर्ती जामदार यांना पीएमएलए प्रकरणी जामीन अर्जाची याचिका सोपवण्यात आली आहे.

न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांनी एखादा व्यक्ती जामीन अर्ज दाखल करतो त्यावेळी त्याला तातडीनं सुनावणी होईल, अशी अपेक्षा असते, असं मत व्यक्त केलं. हे प्रकरण आठ महिन्यांपासून प्रलंबित ठेवणं न्यायशास्त्रानुसार नसल्याची टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली.

हे देखील वाचा : 

शिवसेनाप्रमुखांची सावली म्हणून राहिलेले चंपासिंह थापा शिंदे गटात

शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला ? भुजबळांच्या विधानावर नवा वाद ! 

 

Comments are closed.