Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिंदू पत्नीने बुरखा घालण्यास नकार दिल्याने केली गळा चिरून हत्या .

चेंबूर मधील धक्कादायक घटना !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 27, सप्टेंबर :-  लव्ह जिहाद , बुरखा आणि हिजाब संदर्भात अनेक देशांमध्ये वाढता गदारोळ असतानाच मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इकबाल महमूद शेख नावाच्या व्यक्तीने पत्नी रुपालीचा गळा चिरून खून केला आहे. कारण होते ती मुस्लिम प्रथा पाळत नाही आणि बुरखा घातला नाही.

रुपालीने इक्बाल सोबत आंतरधर्मीय विवाह केला होता, मात्र ती इक्बालच्या बळजबरीला कंटाळून घटस्फोटाची मागणी करत होती. घटस्फोटापूर्वीच आरोपीने तिची निर्घृण हत्या केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आरोपी इकबाल शेख याने पत्नी रुपाली हिला चाकूने वार करून संपविले. मुंबईतील चेंबूर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी इक्बालला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

रुपालीचे तीन वर्षांपूर्वी इक्बाल शेखसोबत प्रेमविवाह झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर दोघेही चेंबूर परिसरात असलेल्या इक्बालच्या घरी राहत होते. रुपाली हिंदू असल्याने आणि लग्नानंतरही ती मुस्लिम रितीरिवाज पाळत नसल्याने स्वत: इक्बाल आणि त्याचे कुटुंबीय तिच्यावर नाराज होते. इक्बालचे कुटुंब रुपालीवर बुरखा घालण्यासाठी दबाव आणत होते, पण ती मान्य करत नव्हती. यावरून वाद झाला. यानंतर रुपाली आणि इक्बाल वेगळे राहू लागले. या जोडप्याला एक मुलगाही आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सहा महिने वेगळे राहूनही दोघे फोनवर बोलायचे. मात्र, यावेळीही इक्बाल तिच्यावर मुस्लिम परंपरा पाळण्यासाठी दबाव आणत असे. रुपाली ही इक्बालची दुसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीला मूलबाळ नसल्याने त्याने तिला घटस्फोट दिला.

आरोपी इकबाल शेख याने रुपालीला सोमवारी सायंकाळी चेंबूर परिसरातील पी.एल. लोखंडे मार्गावरील नागेवाडी येथे भेटण्यासाठी बोलावले. यादरम्यान बुरखा आणि इतर गोष्टींवरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावर रुपालीने घटस्फोटाच्या मागणीचा पुनरुच्चार केला. हाणामारी आणि वाद वाढत गेल्याने इक्बालने खिशातून चाकू काढून रुपालीच्या गळ्यावर वार करून पळ काढला. रुपालीचा जागीच मृत्यू झाला. उपस्थितांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात पाठवला. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबतीत समाजजागृती आणि तरुण पिढीची मानसिकता ओळखून त्यांचे चांगले समुपदेशन होणे गरजेचे आहे. आंतरधर्मीय अथवा आंतरजातीय विवाह करणे गैर नाही,परन्तु सामाजिक मागासलेपणा दूर करणे हे त्या-त्या धर्मातील समाजसुधारकांनी काम केले पाहिजे.

हे देखील वाचा :-

अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घ्यावी – सुप्रीम कोर्ट

Comments are closed.