Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे आदेश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर 23 फेब्रुवारी :- चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना आयोगाने आदेश दिले आहेत. थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे  आदेश आयोगाने  दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे अपील दाखल केली होती, या प्रकरणात आयोगाने जिल्हाधिकारी यांना १६ फेब्रुवारी ला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र आयोगापुढे जिल्हाधिकारी स्वतः हजर झाले नाही, त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी हजर झाल्या होत्या, त्यामुळे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना अटक करून २ मार्च पर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस  महासंचालकांना दिले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनींवर 36 वर्षांपासून अवैध कब्जा केल्याचा आरोप या पीडित आदिवासींचा आहे आणि या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. मात्र आयोगाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.