Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वज्रेश्वरी – गणेशपुरी भागातील समस्यांचा मंत्री दर्जा विवेक पंडित यांनी घेतला आढावा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 
  • सर्व शासकीय विभागाचे अधिकारी आणि नागरिकांची परिपूर्ण बैठक
  • आढावा समिती बैठकीतील प्रश्नांना मार्गी लावणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक
  • वज्रेश्वरी गणेशपुरी सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करून पाठपुराव्याची आवश्यकता – विवेक पंडित

वज्रेश्वरी – दि. २२ फेब्रुवारी : राज्य स्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रसंत गाडगे महाराज आश्रम गणेशपुरी येथे आढावा समिती बैठक पार पडली. वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली भागातील विविध प्रश्न समस्याबाबत नागरिकांच्या विविध तक्रारी विवेक पंडित यांना प्राप्त झालेली या पार्श्वूमीवर आज या आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वज्रेश्वरी देवस्थान, स्थानिक मुलभूत समस्या, वन विभाग, महसूल विभाग,आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम आणि बाल विकास प्रकल्प इत्यादी विभागाशी सबंधित प्रश्नांवर आज सविस्तर चर्चा होउन कृति कार्यक्रमाबाबत विवेक पंडित यांनी संबंधितांना निर्देश दिले.

यावेळी आरोग्य विभागाच्या चर्चेदरम्यान अंबाडी ग्रामीण रुग्णाया बाबत प्रश्न उपस्थित झाल्याने श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी रुग्णालय जमिनीच्या प्रश्नाबाबत पाठपुराव्याबाबत तपशील मांडला, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा समिती बैठकीत विवेक पंडित यांनी याच प्रश्नावर संबंधितांना निर्देशित केलेले. परवा या जागेचा प्रश्न निकाली निघून जागेची दस्त नोंदणी झाल्याचे पवार यांनी उपस्थितांना अवगत केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रश्नाला तडीस नेण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्व सबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन यावेळी अध्यक्ष विवेक पंडित यांनी केले. यावेळी उपविभागिय अधिकारी अमित सानप आणि तहसीलदार अधिक पाटील यांचेही अभिनंदन करण्यात आले. तर अंबाडी ग्रामीण रुग्णालय प्रत्यक्षात निर्माण होईपर्यंत वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण रुग्णालयाचा सेट अप सुरू करावा असा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे निर्देश यावेळी पंडित यांनी दिले.

वन विभागाचे प्रलंबित दावे, परवानगी अभावी रखडलेली विकास कामे याबाबत कृति कार्यक्रम ठविरण्यात आला. वज्रेश्वरी संस्थानच्या अध्यक्षांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला, संस्थान सबंधित अनेक प्रश्न धगधगत असताना अध्यक्ष कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याच्या मानसिकतेत वर्तन करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले, याबाबत धर्मादाय आयुक्तंकडे अहवाल पाठविण्याचे निर्देश पंडित यांनी दिले. येत्या काळात संस्थानच्या मनमानीवर अवार घातला नाही तर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशीही शक्यता यावेळी पंडित यांनी व्यक्त करत पोलिसांनी यात लक्ष घालावे अशा सूचना केल्या.

या बैठकीत अध्यक्ष विवेक पंडित (मंत्री दर्जा), आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी रंजना किल्लेदार, उपविभागीय अधिकारी अमित सानप, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे , तहसीलदार अधीक पाटील, तसेच वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, महसूल, वीजवितरण इत्यादी सर्व विभागाचे अधिकारि उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोइर, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, प्रवक्ते प्रमोद पवार, जया पारधी, फ्रासिंस लेमोस, सुनील लोणे, सुनीता भावर, नारायण जोशी, आशा भोइर, मोहन शिंदे, भगवान देसले,जयेश पाटील,तसेच स्थानिक मंडळ निरीक्षक तलाठी इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

उद्धव ठाकरे यांना धक्का, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती नाही

 

 

Comments are closed.