Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक

गडचिरोली तालुक्यातील शेकडो नागरिकांचा वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी धडक .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.तसेच वाघ हे हिस्त्र पशु असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर  काही गावात हल्ला केल्याने निष्पाप बळी गेला आहे त्यामुळे वाघांचा बंदोबस्त करण्यासाठीशेकडो  नागरिकांनी वनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली. यावेळी गडचिरोली वनवृताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी नागरिकांच्या समस्याचे निराकरण केल्याने आलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

गडचिरोली दि,२३ ऑगस्ट:- मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याने वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा .या मागणीसाठी गडचिरोली तालुक्यातील जेप्रा ग्रामपंचायत तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनेक गावातील शेकडो नागरिकांनी गडचिरोली येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निष्पाप माणसांचा,जनावरांचा बळी घेणाऱ्या वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा  असा पवित्रा नागरिकांनी घेतला असून त्याची दखल न घेतल्यास  आंदोलन छेडण्यात येनार असल्याचे गडचिरोली वनवृताचे  वनसंरक्षक तसेच उपवनसंरक्षक गडचिरोली  यांना देण्यात आलेल्या निवेदनातून म्हटले आहे.

ग्रामपंचायत जेप्रा अंतर्गत जेप्रा, राजघाटा, माल दिभणा आणि राजघाटा चक ,आंबेशिवनी, आंबेटोला, भिकारमौशी, मुरूमबोडी, कळमटोला, धुडेशिवनी, दिभना,बोथेडा या परिसरात वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे .आजूबाजूच्या परिसरातील निष्पाप दहा ते बारा नागरिकांना तसेच दहा ते पंधरा जनावरांचा वाघाने बळी घेतला आहे .त्यामुळे शेतकरी व शेतमजूर सदैव भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वनविभागामार्फत वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक मोरे यांच्या नेतृत्वात प्रादेशिक वनसंरक्षक यांच्याकडे  निवेदनातून करण्यात आले आहे. निवेदन दिल्यापासून चार दिवसात जर वाघाचा बंदोबस्त केला नाही तर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायतील नागरिकांनी आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी वनसंरक्षक डॉक्टर मानकर यांनी निवेदन स्वीकारून  वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकरच करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .

हे देखील वाचा ,

भानामतीच्या संशयावरून दलित महिला – वृद्धाना दोरीने बांधून मारहाण

अनाथाश्रमातील मुलांसोबत ग्रामदुतचे रक्षाबंधन.

जगदेवरामजी चे जनजाती करीता कार्य हे ईश्वरीय: प्रकाश गेडाम यांचे प्रतिपादन

Comments are closed.