Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जगदेवरामजी चे जनजाती करीता कार्य हे ईश्वरीय: प्रकाश गेडाम यांचे प्रतिपादन

प्रथम स्मृतीदिना निमित्त जीवन चित्रात्मक पुस्तकाचा अहेरी येथील विमोचन व रक्षाबंधन कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी २३ ऑगस्ट: गावखेड्यात होत असलेल्या जनजाती/आदिवासी धर्मांतरनाचा विरोध,जनजाती मुलानाच शिक्षण, खेलकुद मध्ये जनजाती ना संधी उपलब्ध करुन देने,सेवा कार्य, निशुल्क आरोग्य सेवा देण्या करीता पु.बाळासाहेब देशपांडे यानी 1952 ला जशपुर येथे वनवासी कल्याण आश्रम ची स्थापना केली.या कल्याण आश्रमाच्या माध्यमातून स्व.जगदेव राम उराँव जी नी 25 वर्षात अमुल्य योगदान देउन जनजाती समाजाची सेवा केली आपल्या 70 वर्षी च्या जिवन कार्यात 50 वर्ष समाजसेवा करणा-या श्रध्देय जगदेव राम जीं चे कार्य जनजाती विकासासाठी ईश्वरीय कार्य आहे.आजच्या पिडीने त्यांच्या ईश्वरीय कार्या पासुन प्रेरणा घ्यावी व सेवा कार्याला तन मण धनाने सहकार्य करावे असे आव्हान प्रकाश गेडाम, प्रांत संयोजक, जनजाती चेतना परीषद, विदर्भ. तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र,महाराष्ट्र यानी केले

विदर्भ वनवासी कल्याण आश्रम जिल्हा अहेरी च्या वतीने कै.च.ल.मद्दिवार शाळा अहेरी येथे स्व.जगदेव राम यांच्या प्रथम स्म्रुतीदिन निमित्त त्यांच्या जीवन चित्रात्मक पुस्तकाचा विमोचन समारंभ व रक्षाबंधन या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी जीवन चित्रात्मक पुस्तकाचे विमोचन करण्यात आले

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विमोचन समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष  गजानन राऊलवार,जिल्हासंघचालक,अहेरी होते, मंचावर प्रमुख अतिथी म्हणून  श्रीकांतजी मंडलेकर,प्रांत कोषाध्यक्ष, वनवासी कल्याण आश्रम, नागपूर, हनमंतु मडावी, से.नि.सहा. वनरक्षक, आलापल्ली,नामदेवराव मोहुर्ले.जिल्हा पालक वनवासी कल्याण आश्रम,अहेरी.उपस्थित होते

यावेळी वनवासी कल्याण आश्रम, अहेरी च्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक   श्रीकांत  मंडलेकर यानी,संचालन   दिनेश ठिकरे  तर आभार   कापगाते   यानी मानले.वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आलीयावेळी बहुसंख्येने मात्रुशक्ती महिला पुरुष परीवारातील संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

भानामतीच्या संशयावरून दलित महिला – वृद्धाना दोरीने बांधून मारहाण

 

Comments are closed.