Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी, हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पाकिस्तानमधील कोर्टाने मुंबई हल्ल्यामगचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी आणि त्यामधील सहभागामुळे लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळी दहशतवादी हाफिज सईदसमवेत जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेच्या चार अन्य सदस्यांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला मोस्ट वाँटेड दहशतवादी घोषित केल्यानंतर गेल्या वर्षी 17 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली होती. हाफिज सईदसह त्याचे दोन साथीदार जफर इकबाल आणि याह्या मुजाहिद या दोघांना 10 वर्ष सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर हाफिजचा नातेवाईक असलेल्या अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हाफिज सईदला यापूर्वीदेखील कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. लष्कर ए तोयबाची फ्रंट ऑर्गनायझेशन Jamaat-ud-Dawa चा प्रमुख असलेल्या हाफिज सईदला आणि त्याच्या सहकार्‍यांना दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी फेब्रुवारी 2020 मध्ये 11 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये 26/11 बाबत चाललेल्या खटल्यात हाफिज सईदला इतके दिवस अटकच होत नव्हती. या हल्ल्यातील दुसरा आरोपी डेव्हिड हेडलीची साक्ष आणि भारताने दिलेल्या अनेक पुराव्यानंतरही पाकिस्तान हाफिज सईदवर कारवाई करत नव्हतं. मात्र आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या कूटनीतीनंतर अखेर हाफिज सईदला बेड्या ठोकण्यात आल्या आणि आता शिक्षादेखील सुनावण्यात आली आहे.मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील हाफिज सईद हा मास्टरमाईंड आहे. या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांसह 166 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात कसाब आणि इतर दहशतवाद्यांना हाफिजने फोनद्वारे माहिती पुरवली होती. पाकिस्तान सरकारने हाफिजचे नाव एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे तो पाकिस्तान सोडून जाऊ शकत नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.