नवीन वर्षातील पहिलीच घटना.
भामरागड तालुक्यातील कोठी टोला येथील रहिवासी विनोद मड़ावी या इसमाची हत्या .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भामरागड, ६ जानेवारी:- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोठी टोला येथील रहिवासी विनोद मडावी याची नक्षल्यांकडून हत्या करण्यात आल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. आज सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह कोठी टोला गावचा रस्त्यावर आढळला. नक्षल्यांने पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशयावरून त्याची हत्या केली आहे. मात्र मृत इसम हा पोलिस खबऱ्या असल्याची अधिकृत माहिती नाही.
विशेष म्हणजे आतापर्यंत नक्षलवादी विविध निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन पत्रके बॅनर लावून करतात निवडणुकी आधी रक्तपात करतात. मात्र यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगात असताना नक्षलवादी लोकांनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केलेले नाही.
नक्षल्यांची ही हत्या केल्याचे निष्पन झाले तर पुन्हा नक्षलग्रस्त दुर्गम भागात दहशतीचे वातावरण निर्माण होईल .सदर घटनेची माहिती पोलिस विभागाला स्थानिकाकडून प्राप्त झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून या घटनेची चौकशी केली तर अधिक माहिती मिळू शकणार आहे.सध्या तरी पोलिसांचा खबऱ्या या संशयावरून हत्या करण्यात आल्याची चर्चा जनमाणसात सुरु आहे पोलिसांच्या चौकशीत हत्येचे कारण स्पष्ट होईल.
Comments are closed.