Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर बदलले, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहेत किंमती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

दिल्ली डेस्क २८ नोव्हेंबर :- 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा 10 रुपयाने कमी झाल्यांनतर दर 48,660 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 47,660 रुपये प्रति तोळावरून कमी होऊन 47,650 रुपये प्रति तोळा झाले आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत अनुक्रमे 51,820 रुपये प्रति तोळा आणि 48,650 रुपये प्रति तोळा आहे. तर या दोन्ही शहरात 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 47,510 रुपये प्रति तोळा आणि 47,650 रुपये प्रति तोळा आहेत. चेन्नईमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमी 45,900 रुपये प्रति तोळा 50,060 रुपये प्रति तोळा आहेत.

कोलकातामध्ये 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 49,810 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर 52,010 रुपये प्रति तोळा आहेत. बेंगळूरू आणि हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 45,460 रुपये प्रति तोळा आहेत, 24 कॅरेट सोन्याचे दर 49,590 रुपये प्रति तोळा आहेत. केरळमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर 45,460 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 49,590 रुपये प्रति तोळावर आहेत. तर पुणे आणि अहमदाबादमध्ये हे दर अनुक्रमे 47,650 रुपये आणि 48,290 रुपये प्रति तोळा आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शुक्रवारी गोल्ड स्पॉटची किंमत 48,850 रुपये प्रति तोळावरून कमी होऊन 48,800 रुपये प्रति तोळा झाली आहे. शुक्रवारची ही किंमत या आठवड्याच्या सरासरी किंमतीपेक्षा कमी आहे. गेल्या आठवड्यात सोन्याची सरासरी किंमत 50,000 रुपये प्रति तोळा होती. आंतरराष्ट्रीय बाजारासंदर्भात बोलायचे झाले तर शुक्रवारी सोन्याचे दर 1,890 डॉलर प्रति औंस आहेत. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची वायदे किंमती 0.19 टक्क्यांनी वाढून 50,858 रुपये प्र​ति तोळा झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.