आठ लाखांची लाच घेताना IAS डॉ. अनिल रामोड यांना अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
विभागीय आयुक्त कार्यालयात (काऊन्सिल हॉल) डॉ. अनिल रामोड यांचे कार्यालय आहे. त्यांच्या दालनातून सीबीआयच्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान, आयएएस अधिकाऱयावर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. रामोड मूळचे नांदेडमधील असून, तेथील घरावर देखील छापा टाकण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून ते पुण्यात महसूलचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. सीबीआयच्या पथकाने सुरू केलेली कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.
पुणे ,दि,१० : पुणे-सोलापूर महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी तक्रारदाराकडून ८ लाखांची लाच घेणाऱ्या पुण्यातील महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सीबीआयने रंगेहाथ अटक केली आहे. त्यानंतर रामोड यांच्या तीन घरामध्ये रात्री उशिरापर्यंत सीबीआयची पथके तपास करत होती. यात रामोड यांच्या घरात तब्बल सहा कोटी रुपयांची रोख रक्कम सापडलीय. शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी १४ स्थावर मालमत्ता अनिल रामोड आणि कुटुंबाच्या नावावर असल्याची कागदपत्रे देखील सापडलीत. अनिल रामोड यांना आज सीबीआय कडून कोर्टात हजर केलं जाणार आहे. अनिल रामोड यांच्याकडे वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी भूसंपादन करण्याची आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी होती. पण रामोड शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखों रुपयांची लाच मागत असत.
डॉ. रामोड यांना हवा होता झेडपीचा पदभार ?
डॉ. रामोड यांची अतिरिक्त महसूल आयुक्त पदनियुक्ती असतानादेखील त्यांना अन्य विभागाचा अतिरिक्त पदभार घेण्याची मोठी हौस होती. आयुक्त सौरभ राव हे रजेवर असताना त्यांच्याकडे काही दिवस विभागीय आयुक्त पदाचा पदभार होता. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेले, तेव्हादेखील डॉ. रामोड यांनी राजकीय दबाव टाकून जिल्हा परिषदेच्या सीईओचा पदभार घेण्यासाठी आदेश काढून घेतला होता. मात्र, दुपारनंतर तो पुन्हा बदलण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषद या मोठय़ा प्रसंगातून वाचली, अशी प्रतिक्रिया आज व्यक्त होत होती.
हे देखील वाचा,
Comments are closed.