बिबट्याचा गावात धुमाकूळ; घरात घुसून १० कोंबड्या फस्त करुन पलंगाखाली लपलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
मौजा बांधगाव टोली येथील घरात घुसलेल्या वन्यप्राणी बिबट शावक (नर) यास जेरबंद करण्यात यश ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आरमोरी दि ०९ : बिबट्या मानवी वस्तीत दिसणे आता सामन्य गोष्ट झाली आहे. सीसीटीव्हीमुळे अनेक बिबट्याने अनेक व्हिडीओ आता व्हायरल होत असतात. मात्र गडचिरोलीत बिबट्या एक व्यक्तीच्या थेट घरार शिरला आणि पलंगाखाली जाऊन बसल्याची घटना समोर आली आहे. बांधगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळतात वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याला जेरबंद केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी सकाळी ६ वाजता बांधगाव येथे कोंबड्या खाण्याच्या उद्देशाने बिबट्या थेट पांडुरंग नेताम यांच्या घरात शिरला. तेथे बिबट्याने १० कोंबड्या फस्त केल्या. त्यानंतर बिबट्या काजीराम औरासे यांच्या घरात घुसला आणि त्यांच्या घरातील पलंगाखाली बसला.
बिबट्या गावात शिरल्याचा माहिती वाऱ्यासारखी पसरली. गावातील काही लोकांनी तातडीने वनविभाीगाला याविषयी माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी देलनवाडी आणि वनकर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोतून पाहणी केली. त्यावेळी बिबट घरातच असल्याचे त्यांना आढळून आले.
वनकर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने धर्मवीर सालविठ्ठल उपवनसंरक्षक वडसा यांचे मार्गदर्शखाली काजीराम तुळशिदास औरासे यांचे राहत्या घरात लपून बसलेल्या बिबट्याला जेरबंद केलं. घरासभोवताल जाळी लावून बिपट्याल लोखंडी पिंजऱ्यामध्ये सुरक्षित इजा न पोहचवता जेरबंद करण्यात आले. सध्या बिबट्याला वनपरिक्षेत्र कार्यालय देलनवाडी येथे नेण्यात आले आहे. काही दिवसांना बिबट्याला पुन्हा जंगलात सोडलं जाईल.
हे देखील वाचा,
अर्ध्या वेतनावर काम करुन घेण्याकरिता ठेका पद्धतीचा जन्म : कॉ. अमोल मारकवार
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत 11.65 कोटींचा निधी मंजूर
Comments are closed.