Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राखीव वनांमध्ये असलेल्या नागरिकांचे अवैध अतिक्रमण वनविभागाने हटविले

वडसा वनविभागाची कारवाई.

४० नागरिकांनी अवैधरीत्या राखीव वनात केले होते अतिक्रमण..

वन विभागाने अतिक्रमण काढल्याने अतिक्रमित नागरिकात भीतीचे वातावरण

वडसा वन विभागाची धाड़सी कारवाई…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वडसा, दि. २८ डिसेंबर : वडसा वनविभागातील आरमोरी वनपरिक्षेत्रातील पळसगाव अंतर्गत सावलखेडा नियतक्षेत्रातील मौजा कराडी येथे कक्ष क्रमांक ७२५ सुरक्षित व कक्ष क्रमांक ६० राखीव वनामध्ये असलेल्या ५ हेक्टर क्षेत्रातील जागेवर कराडी गावात ४० नागरिकांनी अवैधरीत्या अतिक्रमण केले होते. सदर अवैध अतिक्रमण वडसा वन विभागाने सोमवार दि. २७ रोजी हटविले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर अतिक्रमण हटविण्याची कारवाई वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय वायभासे, मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी यांचे नेतृत्वात आरमोरी वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल, वनरक्षक व वनमजूरांच्या सहाय्याने कराडी गावातील ४० अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढण्यात आले.

त्यावेळी अतिक्रमण धारक व कराडी ग्रामवासियांनी कोणताही आडकाठी न करता अतिक्रमण हटविन्यास वनविभागाच्या पथकाला सहकार्य केल्याने मदत झाली आहे .

मागील १५ दिवसात वडसा वन विभागाने अतिक्रमणावर केलेली हि दुसरी कारवाई आहे. यापूर्वी कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील १५ हेक्टर जागेवर झालेले अतिक्रमण हटवले होते. वनविभागाच्या या धडक मोहिमेमुळे अतिक्रमण धारकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

राखीव वनातील अतिक्रमण काढण्याकरिता क्षेत्र सहाय्यक एम. जी. शेख पळसगाव, क्षेत्र सहाय्यक एम.जी.सोनुले वैरागड, वनरक्षक सपना वलादे, विलास शिवणकर, एन.आर. शिऊरकर, कमलेश गीनलवार, गजानन सडमाके, आर.पी.पारधी, पी.एस.धात्रक तसेच वनपरिक्षेत्रातील सर्व वनरक्षक व वनमजूर यांनी मोलाचे सहकार्य केले.

वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करणे हा भारतीय वनअधिनियमन १९२७ कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे कोणीही वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून कायदा हातात घेऊ नये .
धर्मवीर सालविठ्ठल – उपवनसंरक्षक, वन विभाग वडसा

Comments are closed.