Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जुनी पेन्शन योजना लागू करा ; विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांचा संपात उत्स्फूर्त सहभाग

‘काम नाही तर, वेतन नाही’ हे धोरणसुध्दा शासनाने लागू केले आहे.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर, 

1 नोव्हेंबर 2005 पासून बंद करण्यात आलेली जुनी पेन्शन योजना सुरू करावी या प्रमुख मागणीसह कंत्राटी, अंशकालीन, रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, रिक्त पदे त्वरित भरा ,अनुकंप तत्त्वावरील नियुक्ती करा, चतुर्थ श्रेणी व वाहन चालक पदे भरण्यासंदर्भात लावण्यात आलेली बंदी त्वरित हटवा, शिक्षक , नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य गट चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या संयुक्त विद्यमाने आज 14 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला असून कार्यालयात शुकशुकाट असून सर्वत्र ओस पडलेली दिसून येत आहे तर दुसरीकडे कार्यालयीन महत्वाच्या  कामासाठी येणार्याना याचा चांगलाच फटका बसताना दिसून येत आहे . 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली 14 मार्च : 1 एक नोव्हेंबर 2005 पासून बंद करण्यात आलेली जुनी पेन्शन योजना सुरू करावी या प्रमुख मागणीसह कंत्राटी अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, रिक्त पदे त्वरित भरा ,अनुकंप तत्त्वावरील नियुक्ती करा, चतुर्थ श्रेणी व वाहन चालक पदे भरण्यासंदर्भात लावण्यात आलेली बंदी त्वरित हटवा, शिक्षक , नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य गट चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या संयुक्त विद्यमाने आज 14 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला असून यामध्ये कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जुनी पेन्शन योजनासह विविध मागण्यांना घेऊन राज्यभरातील विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदन दिली तर जिल्हातील बाराही तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर व पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर संपात सहभाग घेत निवेदन सादर केली असल्याने जिल्हाभरातील शासकीय तथा निमशासकीय कार्यालयात शुकशुकाट असून सर्वत्र ओस पडलेली दिसून येत आहे तर दुसरीकडे कार्यालयीन महत्वाच्या  कामासाठी येणाऱ्याना चांगलाच मनस्ताप, फटका बसताना दिसून येत आहे

जुन्या पेन्शन मागणीच्या शिलेदारांमधील मध्यवर्ती समन्वय संघटनामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे शिक्षक- शिक्षकेतर व ड श्रेणी कर्मचारी, शालेय शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, महसूल विभाग व नगरपंचायतीचे कर्मचारी, कोषागार कार्यालयाचे कर्मचारी तसेच  गडचिरोली वनवृत्तातील कार्यालयीन कर्मचारी संपात उपस्थित होते. संपात  वनविभाग, वन व सामाजिक वनीकरण संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष उमाजी गोवर्धन, महिला प्रतिनिधी जसवंता दुर्गे, सचिव गोपाल खरवडे, आदिवासी विभागाचे एन एम भिवगडे, एम ए गावंडे, पी एल मेश्राम, अनुदानित आश्रम शाळांच्या विभागीय संस्कृती संघटनेचे श्रीकांत भोयर, बालाजी कणकुंटलावार ,प्रशांत गडपायले, तंगडपल्लीवार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे मारोती गौरकार, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे डॉ.अमित नाइक , एस के बामरे, मराशीपच्यावतीने गिरीश मद्देरलावार, सुनील खंडाळे, सचिन पेदापलीवार, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे आतिश दोतूलवार, मुकेश गोगले, शिवा दोनतूलवारसह आदि पदाधिकारी तहसील कार्यालयाच्या बाहेरील पटांगणावर बेमुदत संपावर बसलेले आहेत.

अहेरी पंचायत समितीच्या बाहेर ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष सुधीर मडावी, कार्याध्यक्ष यशवंत लाडे, यशवंत गोंगले, अनिल बंडावार, सुषमा मडावी, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सोनू शेंडे, विनोद जल्लेवार, जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचे अशोक दहागावकर, किशोर सूनतकर, लक्ष्मण दुर्गे तथा इतर पदाधिकारी क व ड श्रेणीचे कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते यावेळी संपात सहभागी झाले आहेत. तर तलाठी संघटनेचे कर्मचारी 20 तारखेपासून संपात सहभागी होणार असल्याचे माहिती देण्यात आली आहे . शासनाने तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे .तर शासनाने संप टाळण्यासाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची इशारा दिला आहे. तसेच ‘काम नाही तर, वेतन नाही हे धोरणसुध्दा शासनाने लागू केले आहे. त्यामुळे यावर तोडगा निघणार की, संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ..

हे देखी वाचा ,

जुनी पेन्शन संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

रेल्वेसाठी अभिमानाचा क्षण

 

Comments are closed.