Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड.

मुंबई 03 Jul 2022 :- आज विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यामध्ये अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकरांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्याबाजून 164 जणांनी मतदान केले तर 107 जणांनी विरोधात मतदान केले आहे. काही आमदार तटस्थ राहिले तर काही आमदार अनुपस्थीत राहिले.

हे देखील वाचा,https://loksparsh.com/top-news/near-asthi-bus-and-truck-accident/27138/

आजचं अधिवेशन वादळी ठरणार असे वाटत होते परंतु अध्यक्षांची निवड अतिशय शांततेत पार पडली आहे. विधिमंडळात राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी असा सामना रंगला होता. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे आहेत. ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष ठरले आहेत. राहुल नार्वेकर हे एकेकाळचे शिवसेनेचे खंदे नेते होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. राहुल नार्वेकर यांना भाजपाने विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करत आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदार संघाचे आमदार आहेत.

शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात
तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य
2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सत्तेतून बाहेर पडून आम्ही विरोधकांसोबत येत नवं सरकार स्थापन केलं. या राज्यात आता खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा-https://loksparsh.com/news/blood-donation-camp-organized-by-rotary-club-of-virar/27149/

Comments are closed.