Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूरला जगाच्या आकर्षनाचं केंद्र बनविणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर, दि. २५ फेब्रुवारी : नागपुरात विविध ठिकाणी रस्त्यांची आणि पुलांची कामं पुर्णत्वाकडे आहे, यासोबतच फुटाळा तलाव येथे जगातील सर्वात उंच मुझीकल फाऊंटेन तयार करण्यात येणार असून याठीकाणी फलोटींग रेस्टॉरेंट आणि वॉटर स्पोर्टसचीही निर्मिती होणार आहे. याप्रकारे येत्या काही दिवसांमध्ये नागपूरातील विविध विकासकामांच्या पुर्णत्वानंतर, नागपुरला स्वच्छ आणि सुंदर आणि आधुनिक शहर बनवून नागपूरला जगाच्या आकर्षणाचं केंद्र बनविणार असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात बोलतांना व्यक्त केला.

स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रभाग क्र. १९, हंसापुरी खदान, नागपूर येथे विविध विकासकांमांच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होत. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रविण दटके, आमदार विकास कुंभारे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी क्रिडा मैदानाचे लोकार्पण तसचं प्रभागातील विविध चौक आणि मार्गाचे नामकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. नागपुरात आतापर्यंत खेळाची १३१ मैदानं बनविल्या गेली. या मैदानातून तरूणांच्या व्यक्तिमत्वाचा आणि सृदृढ शरीराचा विकास व्हावा, क्रिडा क्षेत्रात तरूणांनी उंच भरारी घ्यावी असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्याचबरोबर तरूणांकरिता जीम आणि विविध विकासकामांसाठी खासदार संसद निधीतून ५० लाख रूपयांची घोषणा केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

पोलीस शिपाई यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गोंडवाना विद्यापीठात ‘मूल्यांकन आणि मान्यता प्रक्रिया’ या विषयावर पार पडली कार्यशाळा

 

Comments are closed.