Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठात ‘मूल्यांकन आणि मान्यता प्रक्रिया’ या विषयावर पार पडली कार्यशाळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २५ फेब्रुवारी :  गोडंवाना विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा तर्फे ‘मुल्यांकन आणि मान्यता प्रक्रिया’ या विषयावर आज विद्यापीठ सभागृहात कार्यशाळा पार पडली. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, मार्गदर्शक म्हणून नॅकचे सल्लागार डॉ. देवेंद्र कवाडे आणि डेप्युटी सल्लागार डॉ. लीना गाहणे, प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल झेड चिताडे आणि संचालक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष डॉ. धनराज पाटील यांची उपस्थित होती.

अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, विद्यापीठाला दहा वर्ष वर्ष पुर्ण झालीत. आता विद्यापीठाचे नॅक एक्रिडेशन हवे आहे. त्यामुळे डिसेंबर २०२२ पर्यंत विद्यापीठाचा एसएसआर सबमिट करायचा आहे .त्यामुळे नॅक मध्ये आपल्याला चांगले ऍक्रिडेशन मिळवण्यासाठी विद्यापीठात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा . निश्चितच आपल्याला नॅक मध्ये चांगलं ऍक्रिडेशन मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपल्या मार्गदर्शनात नॅकचे सल्लागार डॉ. देवेंद्र कवाडे म्हणाले, गुणवत्तेवर भर देत चांगले मानांकन कसे मिळवता येईल आणि विद्यापीठात अमुलाग्र बदल कसे करता येईल हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांची क्षमता वाढवायला हवी, विद्यार्थ्यांमध्ये मूल्य प्रणाली विकसित करायला हवी, तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन द्यायला हवे .आपले हित आपण सगळेच बघतो, पण विद्यापीठाचे हीत देखील आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आपल्या विद्यापीठासाठी आपल्याला चांगले बोलायला पाहिजे. आपल्याला चांगले काम करायला पाहिजे ,त्यासाठी चांगले विचार महत्त्वाचे असतात. संपूर्ण भारतात गोंडवाना विद्यापीठ मोठे होऊ शकते, इतके पोटेन्शियल इथे आहे .इतर संस्थांना भेट देऊन त्यांनी कोणत्या गोष्टी अंगीकारल्या, ते स्वीकारणे महत्त्वाचे आहे आणि त्याचा उपयोग आपल्या विद्यापीठासाठी कसा करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या विद्यापीठ प्रशासना द्वारे जे काही उपयोजित स्वरूपाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत.

विशेषतः ग्रामपंचायत व ग्रामसभा सदस्यांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम, वनसंसाधनांवर आधारित कार्यक्रम, विद्यापीठ प्लेसमेंट सेल द्वारे विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रम, हे विद्यापीठाच्या पुढील नामाकांना करता निश्चितच निर्णायक ठरतील असे ही ते म्हणाले.
नॅकच्या डेप्युटी सल्लागार डॉ. लीना गहाणे यांनी डाटा व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन ही प्रक्रिया कशी असते याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच नॅकला सामोरे जातांना काय निकष राहतील हे देखील त्यांनी समजावून सांगत, प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. तसेच विद्यापीठाने आपली बलस्थाने व आव्हाने यांचा अभ्यास करून ज्या क्षेत्रांमध्ये कमतरता आहे त्यावर उपाययोजना करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. धनराज पाटील आणि प्रा.डॉ. शैलेंद्र देव यांनी परिश्रम घेतले. संचालन प्रा. डॉ. शिल्पा आठवले तर आभार प्रा.डॉ. रश्मी बंड यांनी मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

पोलीस शिपाई यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार

युक्रेनमध्ये गडचिरोलीच्या दोन विद्यार्थिनी अडकल्या

मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विविध विकास कामाची केली प्रत्यक्ष पाहणी

 

Comments are closed.