Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची चार वर्षात तिसऱ्यांदा घेतली शपथ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई दि, 2 : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठे राजकीय भुकंप पाहायला मिळाले यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी  भाजपसोबत जात सत्तेची सूत्रे हाती घेतली आहे. ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आहेत.  राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समोर आले आले आहे.

अजित पवारांसह 9 जणांचा शपथविधी

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम,  संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे.

 

 

Comments are closed.