Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वैद्यराज व वनौषधी लागवड करणाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि13 एप्रिल : गडचिरोली वनविभागाच्या वतीने जिल्ह्यातील माडिया व आदिम प्रवर्गाच्या वैद्यराज व वनौषधी लागवड करणाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचेआयोजन मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील टीपागड सभागृहात करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रशिक्षनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन गडचिरोली वनवृताचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर (प्रा.) यांची उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर आयुक्त आदिवासी विकास रवींद्र ठाकरे,शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नागपूरचे अधीक्षक रवींद्र राऊत, सहा. प्राध्यापक डॉ.घनश्याम कोडवानी,दत्तात्रय काटकर,डॉ.मनीष भोयर,गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके,सहा.प्रकल्प अधिकारी (शिक्षण)प्रभू सादमवार, प्रमोद वरगंटीवार, अनिल सोमनकार, सुधाकर गौरकार यांची उपस्थिती होती.

प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विठ्ठल घोगरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पारंपरिक औषधी बद्दल माहिती दिली.डॉ .गोगुलवार यांनी वन औषधी कश्या प्रकारे तयार करायाची याबद्दल मार्गदर्शन केले तर वनौषधी कशी ओळखायची याबद्दल मिलिंद उमरे यांनी मार्गदर्शन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वनौषधी ओळख व उपचार याबद्दल नंदाजी चलाख यांनी मार्गदर्शन केले,दुर्धर रोगांवर आयुर्वेदिक उपचारा बाबत कालीपद मलिक यांनी मार्गदर्शन केले.हनुमंत नरोटे यांनी गोंडवाना हर्ब्स प्रकल्पाविषयी माहिती दिली.प्रकाश उरकुडे यांनी वनौषधी तयार करून रोगांवर उपचारा बाबत सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित मान्यवर व वैद्यराज यांनी मध्यवर्ती रोपवाटिकेला भेट देऊन विविध वनौषधी व गुणकारी रोपांची माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे संचालन नेताजी अँनपत्रीवार यांनी तर आभार सहा. वनसंरक्षक सोनल भडके यांनी केले .या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यराज,वनौषधी लागवड लाभार्थ्याची उपस्थिती होती तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शिंदे,वनपाल के,एम फाये, वनरक्षक शीतल कुळसंगे आदींनी सहकार्य केले.

हे देखील वाचा,

जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज : केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे प्रतिपादन

मुख्यमंत्री कार्यालयाच्या दबावामुळेच कारवाई अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, सगळे कारस्थान बाहेर येईल; विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा आरोप

दुर्दैवी घटना.. रस्त्यावरील खड्यांनी घेतला बाळ बाळंतिणीचा बळी..

 

 

Comments are closed.