Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त “नौकानयन” स्पर्धाचे आयोजन

शिडाच्या बोटींचा थरार पर्यटकांनी अनुभवला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रायगड : जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रायगड यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पर्यटन दिन २५ जानेवारी २०२२ ग्रामीण आणि समुदाय आधारित पर्यटन “नौकानयन” स्पर्धाचे आयोजन मुरुड तहसीलदार-रोहन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुरुड-राजपुरी समुद्रात घेण्यात आल्या.

प्रथम मुरुड तहसीलदार-रोहन शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून”नौकानयन” स्पर्धाला सुरवात केली.या स्पर्धाकरिता जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित राजपुरी या संस्थेच्या सुलतानी, सुभानी, लक्ष्मी -२, रहेमानी, महराबा, दिलबरी, सलामती, लक्ष्मी-१, नुरानी, अकबरी, लासानी, रब्बानी, इब्रानी, दस्तगिरी या १३ नौका मालकांनी “नौकानयन” स्पर्धात सहभाग नोंदविला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रथम गटात पहिली अल नूरानी (शनवाज डॉक्टर), दुसरी अकबरी (मुस्ताक फहीम) व तिसरी दस्तगिरी (अफाक हददी ) दुसऱ्या गटात प्रथम सुलतानी (इरफान आदमने), दुसरी इमरानी (रिजवान कारभारी), तिसरी रहमानी (फय्याज हददी ) या बोटी विजयी झाल्या .

विजयी नौका मालकांना तहसिदारांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी मुरुड तहसीलदार-रोहन शिंदे म्हणाले की “‘ मुरूड राजपुरी येथील जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला व सुंदर निळसर समुद्रकिनारा या सुंदर पर्यटन स्थळांमुळे जगभरात आपले खास स्थान प्राप्त झाले आहे. पर्यटनामुळे भारताच्या आर्थिक यंत्रणेवरही खूप सकारात्मक परिणाम होत असतो. देश-विदेशातील लोक दरवर्षी भारतातील स्थळे पाहण्यासाठी येत असल्याने आपली आर्थिक पातळी मदत होते. परंतु गेले दोन वर्षे कोरोनाच्या सावटात आपण वावरत आहेत.

त्यामुळे आपलं आर्थिक स्त्रोत बिघडलं आहे. पुन्हा या पर्यटन क्षेत्रात जेप घ्याची आहे. त्याकरिता पर्यटकांना आकर्षणासाठी “नौकानयन” स्पर्धाचे आयोजन जिल्हाधिकारी-डाॅ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. मुरूड तालुक्यातील सभ्यता दर्शविणारी ही रमणीय ठिकाणे केवळ परदेशी पाहुण्यांसाठीच नव्हे, तर सर्व भारतीयांसाठी देखील आकर्षणाचे केंद्र आहेत, आणि नेहमीच असतील. दरवर्षी लाखो पर्यटक स्थळे पाहण्यासाठी ये-जा करिता असतात तरी जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित राजपुरी संस्थेच्या सर्व सहकार्यानी येणा-या जाणा-या पर्यटकांना सहकार्य करा “‘ असे आवाहन मुरुड चे तहसीलदार-रोहन शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी मुरुड तहसीलदार-रोहन शिंदे, निवडणूक नायब तहसीलदार-अमित पुरी, नायब तहसिलदार- गोविंद कोटंबे, मंडळ अधिकारी- विजय मापुस्कर,तलाठी- रेवसकर,नियाज कादिरी, शाहनवाज डाॅक्टर, इस्माईल आदमने,आदिंसह नौका मालक उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

गोंडवाना विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. श्रीराम कावळे

सात अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक तर एक पोलीस अंमलदार यांना मिळाले गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

 

Comments are closed.