Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीतील सर्पमित्रांनी ८ फूट अजगराला दिले जीवदान

मेडिकल कॉलनी येथून ८ फूट अजगर सापाला सुरक्षित पकडून जीवनदान दिले

गडचिरोली 03 July  :- शहरातील सर्पमित्रांनी बुधवारी रात्रोच्या सुमारास मेडिकल कॉलनी येथून ८ फूट अजगर सापाला सुरक्षित पकडून जीवनदान दिले. बुधवारी रात्रो ९.३० वाजताच्या सुमारास शहरातील सर्पमित्रांना मेडिकल कॉलनी कॉम्प्लेक्स परिसरात अजगर साप असल्याची माहिती मिळाली. तत्काळ सर्पमित्रांनी धाव घेत घटनास्थळ गाठले. दरम्यान मोठा अजगर साप दिसून आला. यावेळी पाऊस सुरू असल्याने अजगर सापाला पकडणे कठीण जात होते.

मात्र सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने सापाला पकडले. अजगर साप हा ८ फूट लांब होता. सदर सापाला पकडून गुरुवारी वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितस्थळी सोडण्यात आले. यावेळी क्षेत्रसहाय्यक श्रीकांत नवघरे, सर्पमित्र अजय कुकडकर, चेतन शेंडे, सौरभ सातपुते, आशुतोष गोरले, मनोज पिपरे, प्रणय उराडे आदी उपस्थित होते.

मेडिकल कॉलनीच्या मागच्या परिसरात झुडपी जंगल आहे तिथूनच हा साप आला असावा असा अंदाज नागरिकांनी लावला.
सापाचे अन्नसाखळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. साप हा केवळ मानवमित्र नसून तो निसर्गमित्रही आहे. सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. याशिवाय पिकांवरील कीटक, डासांच्या अळ्या, घुशी यांवर साप नियंत्रण ठेवतो. त्यामुळे साप दिसल्यास त्याला कोणतीही इजा न पोहचवता, न मारता जवळील सर्पमित्रांना माहिती द्यावी असे सर्पमित्र अजय कुकडकर यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा- https://loksparsh.com/top-news/gadchiroli-when-are-the-gutters-and-nallas-cleaned/27168/

Comments are closed.