लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क १ डिसेंबर:- कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळते, असं नातं आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे, मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचंही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी CM योगी आदित्यनाथ मुंबईत कलाकार, दिग्दर्शकांशी चर्चा करणार
बारामती मतदान केंद्रावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मतदानासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. सरकार पडणार असल्याचं विरोधक म्हणत असल्याचं विचारलं असता त्या म्हणाल्या, संघटना आणि कार्यकर्ते नीट ठेवण्यासाठी त्यांना असं बोलावं लागतं, त्यांना सरकारविरोधात बोलण्यासारखं काहीच नाही म्हणून सरकार पडणार असं बोलतायत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूड निर्मात्यांशी तसेच उद्योजकांशी चर्चा करणार आहेत.
Comments are closed.