अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या हाती शिवबंधन.
पक्षप्रवेशानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ०१ डिसेंबर :- अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत सौ. मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. पक्षप्रवेशानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं आहे.
रश्मी वहिनींच्या हस्ते शिवबंधन, बाळासाहेबांना वंदन, उर्मिला मातोंडकर शिवसेनेत दाखल
विधान परिषदेत शिवसेनेचा आवाज उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने अधिक बुलंद होणार आहे. अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल चढवला असताना उर्मिला यांनी ठाम भूमिका घेत कंगना सुनावलं होतं. एक वाजता पक्षप्रवेशाची ठरलेली वेळ अचूक पाळून उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या टायमिंगचीही चुणूक दाखवली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.
कितीही प्रयत्न केले तरी मुंबईपासून बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, सुप्रिया सुळेंचा
Comments are closed.