Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदी स्वस्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 1 डिसेंबर :- सोन्या-चांदीच्या दरात घसरण होताना दिसतेय. सलग तिसऱ्या दिवशी स्पॉट मार्केटसहीत फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्या-चांदीचे भाव नरम राहिले. यासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीची घसरण दिसून येतेय. कोरोना लसीबद्दल येणाऱ्या बातमीमुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसतंय. 

सोमवारपर्यंत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७ हजार ४८३ रुपये आहे. आधीच्या व्यापार सत्रापेक्षा हे १४२ रुपयांनी कमी होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव सरासरी १,७८१, ५० डॉलर होता. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोन्याच्या दराप्रमाणे चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. चांदीचा आजचा भाव ५७ हजार ८०८ रुपये आहे. याआधी चांदीचा भाव ५८ हजार ५०९ रुपये प्रति किलोग्रॅम वर बंद झाले. आधीच्या व्यापारी सत्राच्या तुलनेत चांदी ७०१ रुपयांवर घसरली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची घसरण सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी २२.२९ डॉलर पर्यंत आहे.

Comments are closed.