Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंतप्रधान विश्वचषक क्रिकेट अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहमदाबाद, दि. १७ : सध्या देशभर क्रिकेटप्रेमींसाठी अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. कारण टीम इंडियाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. १९ तारखेला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंनाही उत्साहाचे भरते आले आहे. The Prime Minister will be present to watch the World Cup cricket final

झालेल्या द.आफ्रीका आणि ऑस्ट्रेलियाच्या  सामान्यात ऑस्ट्रेलिया ने विजय मिळविला असल्याने अंतीम सामना १९ तारखेला भारता विरूद्ध ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी सज्ज राहणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतके झळकावली. या सामन्यात कोहलीने आपले ५० वे शतक पूर्ण केले. हे शतक झळकावून कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडला.
आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.

Comments are closed.