Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यानी केली निरपराध तरुणाची हत्या

भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथील घटना...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोलीतील पिपली बूर्गी पोलीस मदत केंद्रात  दिवाळी उत्सवाचे औचित्य साधत पोलीस जवानासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  नक्षलग्रस्त भागाचा दौरा करून  फराळ तसेच आदिवासी बांधवांसोबत भेट घेतली त्यानंतर माध्यमांसोबत संवाद केला  दरम्यान जिल्ह्यातून नक्षलवादी हद्दपार झाल्याचे म्हटले होते. परंतु त्याच दिवशी रात्री नक्षल्यांनी तरुणाची हत्या केल्याने  पुन्हा नक्षलवादी सक्रिय असल्याचे दिसून आले. 

गडचिरोली १६ नोव्हेंबर : भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे नक्षलवाद्यांनी पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून एका तरुणाची दगडांनी ठेचून हत्या केल्याने खळबळ माजली आहे.दिनेश पुसू गावडे (२७) रा. लाहेरी ता. भामरागड असे मृत तरुणाचे नाव असून तो विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भामरागड तालुक्यात असलेल्या धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत पेनगुंडा गावात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी दिनेश हा लाहेरीवरून १५ नोव्हेंबर ला पेनगुंडा येथे गेला होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास संशयित नक्षलवाद्यांनी घेरून त्याची दगडांनी ठेचून तसेच तीक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे हत्या करून घटनास्थळी एक पत्रक दगड टाकले असुन त्यात  दिनेश हा पोलीस खबरी असल्याचे लिहिले आहे. मात्र या संदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याशी बातचीत केली असता मृतक खबरी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सदर घटनेची माहिती होताच धोडराज पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून मृत तरुणाचा मृतदेह आज गुरुवारी सकाळच्या सुमारास शवविच्छेदनसाठी भामरागड येथे नेण्यात आले असून अधिक तपास पोलीस करीत आहे.तपासानंतर दिनेशची हत्या नेमकी का  केली हे स्पष्ट होईल. मात्र या घटनेनंतर आदिवासी दुर्गम भागामध्ये पुन्हा नक्षलची दहशत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.