Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिकार खाण्यासाठी दोन वाघात झुंज;एका वाघाचा मृत्यु तर एक गंभीर

वहानगाव जंगलालगत शेतातील घटना...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चिमूर दि,१७ नोव्हेबर : एका वाघाने
चार दिवसाआधी बैलावर हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर तिच केलेली शिकार खाण्यासाठी मंगळवारला परत येऊन आपली शिकार खात असताना दुसरा वाघ आला आणि आपली शिकार आयती खाणार म्हणून  आलेल्या वाघावर शिकार खाऊ नये यासाठी हल्ला केला. मात्र आलेल्या वाघाने जशास तसे प्रत्युत्तर दिल्याने जवळपास या दोन वाघाची झुंज दोन तास चालली आणि यात एक वाघाचा झुंजीत जागीच मृत्यू झाला तर दुसरा वाघ गंभीर जखमी झाल्याची घटना वहानगाव जंगला लगत असलेल्या सुभाष दोडके यांच्या शेतात घडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चिमूर वनपरिक्षेत्रात असलेल्या खडसंगी बिटातील बफर झोन जंगलालगत शेती मुरलीधर दोडके यांची शेती आहे. रोजच्या प्रमाणे आपले बैल चारण्यासाठी रोज शनिवार दि,१० नोव्हेंबर ला शेतात बैल चारायला नेत असताना मागे येनाऱ्या वाघाने बैलाची शिकार करून ओढत नेत असताना सदर शेतकऱ्यांच्या लक्षात शेतातुन पळ काढला .

त्यानंतर घटना गावात वाऱ्यासारखी पसरताच झुंजीत मृत झालेल्या वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी मुरलीधर दोडके यांच्या शेतात एकच धाव घेतली. मात्र ज्या ठिकाणी वाघ मृत्यू झाला हरभरा लावलेला होता .  त्यामुळे सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचेही  दिसून आले आहे. तर दुसरीकडे वन विभाग मोका पंचनामा करून शवविच्छदन करून अग्नी दिली तर जखमी वाघाला उपचार करण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम धावपळ करीत आहे..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.